एक्स्प्लोर

दक्षिण सोलापूर मतदारसंघ : उमेदवारीसाठी सुभाष देशमुखांची दमछाक होणार? विरोधकांकडून अद्याप चाचपणीच

दक्षिण सोलापूर मतदारसंघाने फक्त राज्यातच नव्हे तर देशातही नेतृत्व दिले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार असतानाच मुख्यमंत्री झाले होते. एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद असणे हे देखील सोलापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे.

सोलापूर हा कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. पूर्वी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात दक्षिण सोलापुरातील 90 गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील 27 गावांचा समावेश होता. मात्र 2009 मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि विधानसभेचे दोन तुकडे झाले. तळवळ भागातील 27 गावे आणि कुंभारी, वळसंग, बोरामणी भागातील 36 गावे अक्कलकोट विधानसभेला जोडली गेली. तर मंद्रूप, भंडारकवठे, कंदलगाव, हत्तुर, आहेरवाडी या भागातील 56 गावे तसेच उत्तर तालुक्यातील 10 गावे आणि सोलापूर शहरातील 12 प्रभागांचा मिळून 'सोलापूर दक्षिण' या नावाचा नवीन विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. या मतदारसंघात शहरी भाग सोडला तर बहुतांश लोक हे कन्नड भाषिक आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघाने फक्त राज्यातच नव्हे तर देशातही नेतृत्व दिले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार असतानाच मुख्यमंत्री झाले होते. एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद असणे हे देखील सोलापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. वि.गु.शिवदारे, आनंदराव देवकते, गुरुनाथ पाटील, रतिकांत पाटील अशा दिग्गजांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विजयाने भाजपची प्रचंड मोठी फळी आता या मतदारसंघात निर्माण झाली आहे. 2009 साली काँग्रेसने माजी मंत्री आनंदराव देवकते यांचा पत्ता कट करुन शहरी भागातील दिलीप माने यांना उमेदवारी दिली. इकडे शिवसेनेने तत्कालीन आमदार रतिकांत पाटील यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं. मात्र तत्कालीन आमदाराचा पराभव करत दिलीप माने यांनी आमदारकी मिळवली. मात्र 2014 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या दिलीप माने यांचा पराभव सुभाष देशमुख यांचा विजय झाला. सुभाष देशमुख यांच्या विजयानं जिल्ह्याला मंत्रीपदही मिळालं. राज्यभरात काँग्रेस राष्ट्रवादीला लागलेली गळतीने सोलापूर जिल्ह्यातही आघाडीला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत भाजपसाठी अनुकूल असं वातावरण तयार झालं आहे. भाजपकडून पुन्हा एकदा सहकारमंत्री सुभाष देशमुख यानांच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुभाष देशमुखांशिवाय सध्यातरी भाजपकडे दुसरा चेहरा या मतदारसंघात नाही. मात्र जर महायुती झाली नाही तर भाजप विरोधात सेनेचा उमेदवार उभा ठाकण्याची शक्यता आहे. गत निवडणूकीत पराभव झालेल्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर हे शिवसेनेकडून या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. 2019 च्या लोकसभेमुळे सोलापूर जिल्ह्यात वचिंत बहुजन आघाडीचा शिरकाव झाला आहे. त्यात दक्षिण सोलापूरच्या भूमीपुत्राचा दबलेला आवाजही आता जोर धरु लागला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण नेते मंडळींमध्ये सत्तेसाठी अप्रत्यक्षपणे संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. मतदारसंघात मेळावा करत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांचे जोरदार विरोध सत्र सुरु झालं आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी भूमीपुत्रांनाच उमेदवारी द्यावी म्हणून स्थानिकांनी एल्गार पुकारला आहे. माजी आमदार दिलीप माने, स्वामी समर्थ सुत मिलचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, बाजार समितीचे माजी उपसभापती श्रीशैल नरोळे यांच्यातील गटबाजीमुळे या मतदारसंघात काँग्रेसची वाताहत झाली आणि ती कायम आहे. प्रस्थापित नेत्यांना पर्याय देण्यासाठी भूमिपुत्रांनी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचे ठरविले आहे. तर वंचितदेखील उमेदवारीसाठी चाचपणी करत आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात धनगर आणि लिंगायत सामुदायाची संख्या प्रचंड आहे. या दोन्ही सामुदायांकडूनदेखील उमेदवारीची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांची लढाई कोणाविरुद्ध होते, हे पाहावं लागणार आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार महिला –1 लाख 44 हजार 402 पुरुष –1 लाख 62 हजार 621 इतर – 5 एकूण – 3 लाख 07 हजार 028 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान सुभाष देशमुख, भाजप - 70,077 दिलीप माने, काँग्रेस–42,954 2019 च्या लोकसभेत दक्षिण सोलापूर विधासभेतून उमेदवारांना मिळालेली मते डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप – 88,691 सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस – 50,913 प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी – 28,092

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Embed widget