एक्स्प्लोर

Solapur Municipal Election 2026: अजित पवारांना दे धक्का, राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; राजकीय वर्तुळात खळबळ

Solapur Municipal Election 2026: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय.

Solapur Municipal Election 2026: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना भाजपने (BJP) मोठी खेळी खेळली आहे. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तुषार जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 9 ड मधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती. 

Solapur Municipal Election 2026: सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

मात्र राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत आता एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार आपल्या गोटात घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मतदानापूर्वीच घडलेल्या या घडामोडीमुळे सोलापूरच्या राजकारणात आणखी नाट्यमय वळण लागले आहे.

Solapur Municipal Election 2026: सोलापूर महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार?

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरीचे सूर स्थानिक आमदारांकडून ऐकू येत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. सकाळी एका पक्षात असलेले नेते संध्याकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सततच्या राजकीय उलथापालथीत सर्वसामान्य सोलापूरकर मात्र पुरता हैराण झाला आहे. प्रत्येक राजकीय नेता आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त असताना, सोलापूरच्या विकासाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 102 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 102 पैकी 49 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर शिवसेनेला 21, काँग्रेसला 11, एमआयएमला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला 4, बसपाला 4 आणि माकपला 1 जागा मिळाली होती. आता 2026 च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचा फैसला येत्या 16 जानेवारीला होणार आहे.

आणखी वाचा 

Latur Municipal Election 2026: भाजप उमेदवारासाठी पैसेवाटप; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नातेवाईक रंगेहात पकडला, लातूरमध्ये खळबळ

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
Gold Rate : सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
मोठी बातमी! शिवाजी पार्कवरुन आदित्य ठाकरेंनी फोटो दाखवला, फडणवीसांनी कोस्टल रोडचा किस्साच सांगितला
मोठी बातमी! शिवाजी पार्कवरुन आदित्य ठाकरेंनी फोटो दाखवला, फडणवीसांनी कोस्टल रोडचा किस्साच सांगितला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
Gold Rate : सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
मोठी बातमी! शिवाजी पार्कवरुन आदित्य ठाकरेंनी फोटो दाखवला, फडणवीसांनी कोस्टल रोडचा किस्साच सांगितला
मोठी बातमी! शिवाजी पार्कवरुन आदित्य ठाकरेंनी फोटो दाखवला, फडणवीसांनी कोस्टल रोडचा किस्साच सांगितला
Nashik Bribe: नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग लागला, अटकपूर्व जामिनासाठी दोघांनी मागितली दोन लाखांची लाच, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार
नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग लागला, अटकपूर्व जामिनासाठी दोघांनी मागितली दोन लाखांची लाच, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार
मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी
मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी
Pramod Jadhav Satara: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; एकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सातारामधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, अपघातात मृत्यू झाला; एकीकडे लेकीचा जन्म झाला, दुसरीकडे बापाचा देह उठला, सातारामधील घटनेनं महाराष्ट्र रडला!
Crime News: रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, अन् प्रियकरासोबत... नववीत शिकणाऱ्या मुलीचं भयंकर कृत्य!
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, अन् प्रियकरासोबत... नववीत शिकणाऱ्या मुलीचं भयंकर कृत्य!
Embed widget