एक्स्प्लोर
राणेंच्या स्वाभिमान पक्षाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षाची कार अज्ञातांनी जाळली
आग विझवण्यात यश आलं परंतु कार मात्र जळून खाक झाली. हा प्रकार नेमका कोणी केला याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.
सिंधुदुर्ग : निवडणुकीचे बिगुल वाजताच सिंधुदुर्गमधील वातावरण तापलं आहे. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष आणि माजी खासदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक संजू परब यांच्या इनोव्हा कारची अज्ञातांनी जाळपोळ केली. काल रात्री उशिरा हा प्रकार घडला. पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत गाडी आगीत पूर्णतः जळून खाक झाली होती.
संजू परब यांनी नेहमीप्रमाणे आपली गाडी खासकीलवाडा परिसरातील रोड इथल्या साई दीपदर्शन या इमारतीसमोर पार्क केली होती. रात्री बाराच्या सुमारास ते घरी गेले. त्यानंतर रात्री उशिरा गाडी जळत असल्याचा आवाज आला. बाहेर येऊन पाहिलं असता गाडी पेटत होती. आग विझवण्यात यश आलं परंतु कार मात्र जळून खाक झाली.
राजकीय वैमानस्यातून प्रकार घडल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. घटनास्थळावर यावेळी दारुचे साहित्य तसंच कॅनचे बूच आढळून आले. त्यामुळे गाडीवर काही तरी ज्वलनशील ओतून हा प्रकार केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा सुरु होता.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षाच्या कारची जाळपोळ https://t.co/ynY9gRsEq5 pic.twitter.com/9pNLnera4Y
— ABP माझा (@abpmajhatv) March 12, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement