एक्स्प्लोर

Shisvena UBT : मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटप सुरु, मातोश्रीवर मोठ्या घडामोडी, कार्यकर्ते दाखल

Shivsena UBT : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वी एबी फॉर्म वाटप सुरु केलं आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं युती केली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष देखील ठाकरेंसोबत मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं असणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवेसना आणि राज ठाकरेंची मनसे मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, उमेदवार यादी जाहीर करण्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटप 

मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांचे नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निश्चित झाला आहे, त्यातील काही उमेदवारांना मातोश्रीवर बोलावण्यात आलं आहे. काही जणांना आज रात्री आणि काही जणांना उद्या एबी फॉर्मचं वाटप करून अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे. उमेदवारांची यादी उद्या जाहीर केली जाईल मात्र त्याआधी एबी फॉर्म द्यायला मातोश्रीवर सुरुवात केली असल्याची माहिती आहे.  

ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे मुंबई महापालिकेत किती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं त्यांना आव्हान असेल. याशिवाय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढतेय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत उमेदवार जाहीर केले आहेत.

मलबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा मेळावा

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईतील मलबार हिल विधानसभेत एकत्रित बैठक पार पडली आहे. या बैठकीला दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.दक्षिण मुंबईचे ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत व मनसे नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेससोबत न जाता ठाकरें बंधूंसोबत युती करणार आहे.  ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 10 ते 12 जागाच देण्यात येणार असल्याची माहिती आहे.  

मुंबई  महापालिका निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Embed widget