एक्स्प्लोर

मोदींना कुबड्या घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल; सामनातून संजय राऊतांचा घणाघात 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून देवेंद्र फडणवीसांचे 'मी परत येईन' नाटक बंद पाडले. अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल.

Sanjay Raut on Modi oth ceremony : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. एनडीएच्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. आज सायंकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडणार आहे. शपथविधीआधी शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधलाय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबतही त्यांनी मोठा दावा केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. संजय राऊतांनी रोखठोख सदरात काय म्हटलेय पाहूयात.. 

फडणवीसांचे 'मी परत येईन' नाटक बंद पाडले  -

मोदी सरकारातील 17 मंत्र्यांचा दारुण पराभव झाला. यात स्मृती इराणी आहेत. अमेठीत राहुल गांधी यांचा 'पीए' के. एल. शर्मा यांनी हा पराभव केला. महाराष्ट्रात रावसाहेब दानवे, भारती पवार व कपिल पाटील हे तीन मंत्री लोकांनी आपटले. उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने मुंबईत उभे केले व काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना पाडले. प्रकाश आंबेडकर स्वतः अकोल्यात पराभूत झाले. भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करू पाहणारे नेते व त्यांचे पक्ष या निवडणुकीत लोकांनी फेकून दिले. उत्तर प्रदेशात मायावतींचे राजकारणच संपले असा निकाल लोकांनी दिला. जेथे मोदी-शहांनाच लोकांनी झिडकारले तेथे इतरांचे काय? महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून देवेंद्र फडणवीसांचे 'मी परत येईन' नाटक बंद पाडले. अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल. मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबड्या घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल. या नव्या रचनेत अमित शहांकडे गृहखाते राहील काय? याच गृहखात्याच्या गैरवापराने नरेंद्र मोदींचे नुकसान झाले व लोकांच्या दृष्टीने ते खलनायक ठरले. भविष्यात अमित शहांविरोधात पक्षातच आवाज उठेल असे चित्र आहे. बहुमत गेल्याने लोकांची भीती मेली आहे. बहुमत गमावलेल्या भाजपने मोदी यांना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच उठण्याची शक्यता जास्त आहे. असे घडले तर महाभारताच्या चारित्र्याला पुन्हा उभारी येईल !

मोदींना कुबड्या घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल 

लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे लोकशाही अमर आहे. भारतात लोकशाही मारणाऱ्यांचा माज शेवटी उतरवला जातोच. चारशेपारचा नारा देणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी साधे बहुमतही मिळवता आले नाही व एनडीएच्या नावाने कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची वेळ त्यांच्यावर आली. हे सरकार टिकणार नाही. भारतीय लोकशाहीचे चारित्र्य घसरणीला लागले आहे हे लोकसभा निवडणुकांनी दाखवून दिले. "चारित्र्याचे मोल किती आहे?" हे एकाच वाक्यात सांगायचे तर "चारित्र्याचे मोल महाभारताएवढे आहे" असेच उत्तर द्यावे लागेल. लोकसभा निवडणूक निकालानंतर महाभारताचे चारित्र्यहनन मोठया प्रमाणात सुरू झाले. 18 व्या लोकसभेची निवडणूक झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपचा दारुण पराभव जनतेने केला. 2014 आणि 2019 प्रमाणे मोदी यांना सरकार स्थापनेसाठी साधे बहुमत मिळवता आले नाही. देशाच्या जनतेने सत्तेतील पासिस्ट प्रवृत्तींचा पराभव केला. भाजपला 234 जागाच मिळाल्या व बहुमताच्या आकडय़ापासून 40 जागा दूर ठेवले. नरेंद्र मोदींचा हा पराभव आहे. तरीही मोदी यांनी आता 'एनडीए'चे सरकार म्हणून तिसऱ्यांदा शपथ घ्यायचे ठरवले. मोदी हा देवाचा माणूस (असा त्यांचा दावा), पण देवाचा माणूस सत्तेशिवाय जगू शकत नाही व बहुमताचे कडबोळे बांधून मोदी सिंहासन प्राप्तीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले. मोदी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील, पण गेल्या दहा वर्षांत त्यांनी हजारदा जनतेला दिलेली 'वचने व शपथा' मोडल्या आहेत त्याचे काय?

नितीश कुमार यांच्याबाबत मोठा दावा - 

बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबड्या घेऊन सरकार बनवीत आहेत. नितीश कुमार यांच्या 'जदयु' पक्षाला 12 व चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमला 16 जागा मिळाल्या. त्यामुळे या दोघांच्या अटी मानून मोदी सरकार बनवतील, पण चालवू शकतील काय? 5 जून रोजी मी दिल्लीत होतो. मोदींनी बोलावलेल्या बैठकीस नितीश व चंद्रा हे दोन बाबू उपस्थित होते. मोदी यांना पाठिंबा द्यायच्या बदल्यात या दोन्ही बाबूंना जे हवे ते दिले जाईल काय? चंद्राबाबू यांना लोकसभा अध्यक्षपद, गडकरींकडे असलेले बांधकाम, रस्ते उभारणी व ऊर्जा मंत्रालय हवे, तर नितीश कुमारांना गृह, संरक्षण, परिवहन अशी खाती हवीत. शिवाय रेल्वे खातेही बिहारकडे असावे व ते चिराग पासवान यांच्या पक्षाकडे असावे अशी नितीश कुमारांची भूमिका आहे. मोदी व शहा यांचा प्राणच ओरबाडून घेण्याचा हा प्रकार आहे. शिवाय इतर लहान पक्षांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. या सगळया व्यवहाराची मोठी किंमत उद्या देशाला चुकवावी लागेल. 


अंदाज चुकले
इंडिया आघाडीस 234 जागा मिळाल्या. 125 जागाही या सगळय़ांना मिळून जिंकता येणार नाहीत अशी भाषा मोदी करीत होते. त्या इंडियाने मोदींचे बहुमताचे पंखच कापले व त्यांना जमिनीवर आणले. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमुळे मोदींचे स्वप्न भंगले. अखिलेश यादव यांनी श्रीरामाच्या भूमीतच मोदींना रोखले. 80 पैकी 42 जागा अखिलेश व राहुल यांच्या युतीने जिंकल्या. अयोध्या असलेले फैजाबाद व रामभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान असलेले 'चित्रकूट' या दोन्ही ठिकाणी मोदी-भाजपचा पराभव जनतेने केला. मोदी हे काशीचे नरेश असल्याच्या आविर्भावात वावरतात. त्या काशीतच मतदारांनी मोदींचा नैतिक पराभव केला. पाच लाखांचे मताधिक्य जेमतेम दीड लाखावर आले. हा पराभव नाही तर काय? स्वतःला देवत्व बहाल करून लोकांना भोंदू बनवणाऱ्यांचा खेळ त्यामुळे काशीतच आटोपला. रामाचा व्यापार गेल्या दहा वर्षांत झाला. तो रामाच्या नगरीतच प्रत्यक्ष श्रीरामाने बंद पाडला. मोदी यांच्या काळात वाराणसीचे गुजरात झाले. येथील व्यापार, उद्योगाच्या सर्व नाडय़ा गुजराती व्यापाऱ्यांकडे गेल्या. रस्ते, हॉटेल्सचे ठेके फक्त गुजरात्यांकडे पद्धतशीर गेले. वाराणसीच्या मतदारांनी या भोंदूगिरीचा बदला घेतला. मोदी यांचा राजकीय अवतार त्यामुळे संपल्यातच जमा आहे. त्यांचे खोटे बोलणे, खोटे रडणे, खोटे हसणे या सगळय़ात जनता कंटाळली व लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पायाखालची बहुमताची सतरंजीच ओढली हे सत्य आहे.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
RBI : रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांचे निर्बंध, ठेवी स्वीकारणे, कर्ज देण्यास मनाई
रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध,
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
माणिकराव कोकाटेंना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता फडणवीसांनी घ्यावी; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
बीड अन् धाराशिव पोलिसांची सिनेस्टाईल 'रेड'; राना-वनातून घुसल्या गाड्या, चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या
Prithviraj Chavan: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता, पाकिस्तानने भारताची विमानं पाडली; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ
Embed widget