धारावी प्रकल्प रद्द करणार, मोफत शिक्षण; ठाकरे गटाकडून आश्वासनांचा पाऊस; वचननाम्यात नेमकं काय असेल?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांकडून वेगवेगळी आकर्षक आश्वासनं दिली जात आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षही वचननामा जाहीर करणार आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) राज्यातील प्रत्येक प्रमुख पक्षाकडून मतदारांना आकर्षक आश्वासनं दिली जात आहेत. आम्ही सत्तेत आलो तर शिक्षण, आरोग्य, वाहतूक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काय-काय काम करणार? याबाबत या पक्षांकडून मतदारांना सांगितले जात आहे. कोणी आपल्या या आश्वासनांना समतापत्र, कोणी जाहीरनामा तर कोणी वचननामा म्हणत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाकडूनही लवकरच आपला वचननामा जाहीर केला जाणार आहे. त्याआधी त्यांच्या या आश्वासनांत नेमकं काय असू शकतं? याबाबतची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेना (Uddhav Thackerya Shivsena) वचननाम्यात खालील आश्वासनं नमूद असू शकतात.
1. राज्यातील विद्यार्थिनींना सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे गरजेचे
2. पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.
3. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, आगामी काळात मविआची सत्ता आल्यास आम्ही धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन घेऊ
4. राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल.
5. आता पुन्हा आमची सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल
त्या सोबतच माविआच्या कालच्या सभेत जाहीर केलेल्या पंचसूत्र, त्रीचाही वचननाम्यात समावेश असणार आहे.
हेही वाचा :
लोकसभेला 4 लाखांपेक्षा जास्त मतं घेणाऱ्या भारती कामडी ऐनवेळी शिंदे गटात; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट