एक्स्प्लोर

मतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या 'त्या' वक्तव्यावर शरद पवार म्हणतात...

एनडीएला बहुमत मिळालं नाही तर ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरतील असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मुंबईमध्ये पेडर रोड परिसरात आज मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी काल पंतप्रधानपदाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी भाष्य केले. मला मिस कोट केलं असल्याचं शरद पवार म्हणाले.  त्या मुलाखतीत मला विचारलं होतं की, राहुल गांधींशिवाय इतर कोण पर्याय आहेत, तर त्यावर मी मायावती, ममता, चंद्राबाबू नायडू अशी नावं सांगितली.
हे ज्यांनी चुकीचं छापलं त्यांचा बालिशपणा आहे. हे केवळ टीआरपीसाठी असं छापलं असल्याचं देखील पवार म्हणाले. सोबतच देशात स्थिर सरकार येणं आवश्यक आहे. आजचा दिवस देशासाठी महत्वाचा आहे.
मुंबईतील मतदान टक्केवारी बाबत काळजी वाटते. मात्र मुंबईकर महत्वाच्या दिवशी मोठ्या संख्येने मतदान हक्क बजावतील. मुंबई मागे राहणार नाही, असेही पवार म्हणाले. मला सगळ्या निवडणुका  महत्वाच्या आहेत. मावळ काय, बारामती काय, मुंबई काय सगळ्याच निवडणुका महत्वाच्या आहेत. यावेळी लोक निर्णायक निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी पुन्हा एकदा काल पंतप्रधानपदाविषयीचा अंदाज वर्तवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा गरम झाली होती.  एनडीएला बहुमत मिळालं नाही तर ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरतील असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पवारांनी हे वक्तव्य केलं होतं.
आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं देखील पवारांनी आवर्जून म्हटलं होतं. राष्ट्रवादी फक्त 22 जागा लढत आहे, या सर्व जागा आम्ही जरी जिंकल्या तरी बहुमताचा आकडा फार मोठा आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले होते.
एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे मला पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय दिसतात, कारण त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्रिपदाचा अनुभव आहे, असेही पवार म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: 'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
Maharashtra blog live updates: भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: 'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
Maharashtra blog live updates: भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Maharashtra Rain Weather updates: वाऱ्यांचा वेग वाढला, वातावरण बदलायला सुरुवात, 13 राज्यांत पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय स्थिती?
वाऱ्यांचा वेग वाढला, वातावरण बदलायला सुरुवात, 13 राज्यांत पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय स्थिती?
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Embed widget