एक्स्प्लोर

Satara Lok Sabha Result 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विजयी, पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला

Satara Lok Sabha Election Result 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विधानपरिषद आमदार  शशिकांत शिंदे यांच्यात लढत झाली. 

सातारा : राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Lok Sabha) होय. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे गेला. भाजपनं राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे  होता. महाविकास आघाडीतून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) लोकसभेच्या रिंगणात होते. दोन्ही बाजूनं सातारा लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार प्रचार करण्यात आला.सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. साताऱ्यात 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सातारा लोकसभा मतदारसंघात अखेर उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. शशिकांत शिंदे 13 व्या फेरीनंतर पिछाडीवर गेले. सातारा लोकसभा मतदारसंघातून मिळवलेल्या आघाडीच्या जोरावर उदयनराजे भोसले विजयी झाले. 

सातारा लोकसभा निवडणूक निकाल  2024 (Satara Lok Sabha Election Result 2024)  

उमेदवाराचे नाव    पक्ष निकाल
उदयनराजे भोसले  भाजप विजयी 
शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार  

खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार कसा झाला?

महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याअगोदर खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपकडे घेण्यात आली. भाजपनं उशिरानं उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. 

उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराड येथे प्रचार सभा घेतली. तर, प्रचाराच्या समारोपाची सभा साताऱ्यात झाली. त्या सभेला महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वाई विधानसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांच्यासाठी अखेरच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभा घेतली. 

खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचारात महायुतीच्या आमदारांची साथ मिळाली. यामध्ये राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई, सेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे, सातारा जावळी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी प्रचाराची जबाबदारी पार पाडली. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे भोसले यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप केले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.  

आमदार शशिकांत शिंदे यांचा प्रचार कसा झाला?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे सातारा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने, सारंग पाटील यांच्या नावांची चाचपणी केल्यानंतर विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली. शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर होताच  सातारा लोकसभा मतदारसंघाच्या विविध भागात प्रचाराच्या निमित्तानं पोहोचण्याचा प्रयत्न केला. 

शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द शरद पवार, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील यांनी हजेरी लावली होती. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचार सभा घेतल्या. शशिकांत शिंदे  यांच्या प्रचाराच्या समारोपाच्या सभेत आपचे खासदार संजय सिंह यांची उपस्थिती आणि भाषण लक्षवेधी ठरलं.


साताऱ्यातील मतदानाची आकडेवारी 

सातारा लोकसभा मतदारसंघात  एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. यामध्ये 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान  कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.59 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान पाटण विधानसभा मतदार संघात 56.95 टक्के इतके झाले. 

सातारा लोकसभेतील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी :

कोरेगाव :  2 लाख 11 हजार 680 मतदान, 67.59 टक्के 
कराड उत्तर : 1 लाख 94  हजार 29 मतदान,  65.34 टक्के  
कराड दक्षिण : 1 लाख 98  हजार 633 मतदान,  65.65 टक्के  
पाटण  : 1 लाख 70  हजार 616  मतदान,  56.95 टक्के  
सातारा : 2 लाख 10  हजार 656 मतदान,  62.74 टक्के 
वाई : 2 लाख 7 हजार 878 मतदारांनी मतदान, 60.83  


सातारा लोकसभेतील विधानसभातील आमदारांची भूमिका काय?   

कोरेगाव :  महेश शिंदे, शिवसेना, पाठिंबा : उदयनराजे भोसले 
कराड उत्तर : बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पाठिंबा : शशिकांत शिंदे  
कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस, पाठिंबा: शशिकांत शिंदे   
पाटण  : शंभूराज देसाई, शिवसेना, पाठिंबा :उदयनराजे भोसले
सातारा : शिवेंद्रराजे भोसले, भाजप, पाठिंबा : उदयनराजे भोसले
वाई : मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, पाठिंबा :उदयनराजे भोसले

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान यावेळी झालं आहे. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या : 

Gondia-Bhandra Lok Sabha Result 2024 : भंडारा-गोंदिया मतदारसंघता कोण बाजी मारणार? भाजपचे सुनील मेंढे, की काँग्रेसचे पडोळे?

Nashik Lok Sabha Result 2024 : नाशिकमधून गोडसे की वाजे, कोण उधळणार गुलाल? वाचा लोकसभेचा निकाल एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP MajhaABP Majha Headlines :  10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGanpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी; प्रशासनाकडून सतर्कतेचे फलक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
NEET Paper Leak Case : मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
MLC Election : काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेवर कुणाला संधी,  कोणत्या नेत्यांची नावं चर्चेत?
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेचा फैसला होणार? कुणाला संधी
Munjya Box Office Collection Day 18 :  बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना,  18 व्या दिवशी किती केली कमाई?
बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना, 18 व्या दिवशी किती केली कमाई?
Pirates Of the Caribbean actor Tamayo Perry Dies :  सर्फिंग करताना शार्कचा हल्ला, अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा...
सर्फिंग करताना शार्कचा हल्ला, अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा...
Embed widget