एक्स्प्लोर

Saroj Patil : शरद पायाला भिंगरी लावून फिरतोय मी घरात कशी बसू? मला फक्त मुश्रीफला पाडायचंय, सरोज पाटील यांचं बारामतीत आक्रमक भाषण

Saroj Patil : शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी 'निर्भय बनो'च्या सभेत आक्रमक भाषण केलं आहे.

Saroj Patil, बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात आज (दि.14) 'निर्भय बनो'ची सभा पार पडली. या सभेला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, वकिल असीम सरोदे यांच्यासह शरद पवार यांच्या बहीण आणि एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या देखील उपस्थित होत्या. सरोज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठं यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीचे कोणते उमेदवार विजय होतील, याबाबतही सरोज पाटील यांनी भाष्य केलं. 

सरोज पाटील काय काय म्हणाल्या?

 शरद पायाला भिंगरी लावून फिरतो त्याचं वाईट वाटतं. मी घरी कशी बसू? कोल्हापूरमध्ये आमचे सगळे लोकं येणार आहेत. मला फक्त मुश्रीफला पडायचं आहे. भाजपचे अत्यंत नालायक लोकं आहेत. भिडे लोकांना पैसे देतो दारू देतो आणि भाजपचा प्रचार कर म्हणतो. आईने पोरांवर लक्ष ठेवले पाहिजे. भाजप सोडून कुणालाही मतदान करा. हे नालायक लोकं आहेत, असंही सरोज पाटील म्हणाल्या. ़

पुढे बोलताना सरोज पाटील म्हणाल्या, आमचा जन्म पारतंत्र्यात झाला. आमच्या घरात नाना पाटील घरात लपून बसायचं. जाताना त्यांना पैसे द्यायचं. घरचे आम्हाला दम द्यायचे घरात कुणी आहे म्हणून सांगायचे नाही...आमची आई म्हणायची जे समाजाचा संसार करतात त्याचा संसार समाजानं करायचा असतो. शरद पवार आणि एन डी पाटील राजकारणाचा जोडे बाजूला ठेवायचे आणि घरात यायचे. आमच्या आई वडिलांना सगळ्यात लाडका जावई एनडी होते. फाटका जावई लाडका होता.

आमची मुले म्हणायची आम्हाला एकच मामा म्हणजे तात्यासाहेब मामा (अजित पवारांचे वडील) असं बोलताना सरोज पाटील भावनिक झाल्या. लोकशाही टिकवा भटा ब्राह्मण यांच्या नादाला लागू नका. गाण्यापासून बोध घ्या आणि भाजपला चिरडून टाका, असं आवाहनही सरोज पाटील यांनी केलं. 

असीम सरोदे म्हणाले, न्यायाधीशांना जास्त कायदा कळतो. पण कळलेला कायदा कुणाच्या बाजूने वापरायचा हे ते ठरवतील असतील त्यांनी घरी बसावं. चंद्रचूड साहेबांना सांगायला पाहिजे. की तुम्ही संविधानिक निर्णय घेण्यास कमी पडला. नरेंद्र मोदी यांनी न्याय व्यवस्थाचा पाया कमकुवत केला जेव्हा ते गणपतीच्या आरतीला गेले तेव्हा. आज काँग्रेसच्या नेत्या मार्फत मी जे भाजपचे उमेदवार म्हणाले होते. संविधान बदलू त्यांच्यामार्फत मी निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे.

मी जरांगे पाटील यांच्याशी बोलायचो भेटायचो. शरद पवार आणि उद्धव ठाकरे म्हणाले त्यांच्याशी बोला. विधानसभेला जरांगे पाटील उमेदवार देणार होते.. मी त्यांच्याकडे गेलो.  जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत.. कारण मताचे विभाजन होईल.. जरांगे म्हणाले माझा राग फडणवीस यांच्यावर आहे, असंही फडणवीस म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Women Not Secure News : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत रिक्षा चालकाकडून तरुणीवर अत्याचारMaha Kumbh 2025 : मुस्लिमांचं वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी करणार,महाकुंभमध्ये होणार 27 तारखेला धर्म संसदABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 January 2025Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Embed widget