Sanjay Shirsat VIDEO : कालीचरण महाराजांची जरांगेंना शिवीगाळ; संजय शिरसाट म्हणाले, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही
Sanjay Shirsat VIDEO : जर तुम्ही पेट्रोल, भाववाढ यावर मतदान कराल तर हिंदू राजा सत्तेत कसा बसेल असा प्रश्न विचारत कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती.
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया आली आहे. कालीचरण महाराजांशी माझा काही संबंध नाही, मी असा कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता असं संजय शिरसाट म्हणाले. मनोज जरांगे यांचा मी नेहमीच आदर करतो असंही ते म्हणाले. कालीचरण महाराजांनी मनोज जरांगेंना हिंदुत्व तोडणारा राक्षस असं म्हणत शिवीगाळ केली होती.
आरक्षणसाठी नाही तर हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस असं म्हणत कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती. पेट्रोल, दरवाढ, भाववाढीवर मतदान कराल तर हिंदू राजा सत्तेत कसा बसेल असा सवाल कालीचरण महाराजांनी विचारला होता. मौलवींच्या सांगण्यावरून मुस्लिम मतदान करतात, त्यामुळे तुम्ही हिंदू हितांबाबत बोलणाऱ्यांनाच मतदान करा असंही आवाहन त्यांनी केलं होतं.
कालीचरण महाराजांशी काही संबंध नाही
कालीचरण महाराजांनी मनोज जरांगे यांना शिवीगाळ केल्यानंतर त्यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. आपण असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नव्हता असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट म्हणाले की, माझ्या मतदारसंघात कालीचरण महाराजांची सभा झाली. पण त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. ना मी त्यांना भेटलोय, ना मी कुठे उपस्थित होतो, ना माझे बॅनर लागलेत. पण अशा काही बातम्या आल्या तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. जरागे पाटलांचा आणि आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून आम्ही त्यांना मदत करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मराठा समाजात काही गैरसमज झाला की मी काहीतरी हे घडवतोय तर त्याचा परिणाम वाईट होईल याची जाणीव मला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, मी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी हे वक्तव्य केलं अशा काही बातम्या आल्या. पण मी असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही आणि जरांगे पाटलांविषयी मला नेहमीच आदर आहे.
Kalicharan Maharaj Speech : काय म्हणाले होते कालीचरण महाराज?
कालीचरण महाराज म्हणाले की, आता एक आंदोलन हिंदूमध्ये फूट पाडण्यासाठी झालं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखो लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस.
हिंदू लोक मतदानालाच जात नाहीत तर मग राजा कोण येणार तर मुसलमानाचे पाय चाटणारा. हिंदू मतदान करतील तर कट्टर हिंदू राजा होईल. जर तुम्ही पेट्रोल, दरवाढ, भाववाढसाठी मतदान कराल मग राजा कोण बसणार? असा सवाल कालीचरण महाराजांनी विचारला.
ही बातमी वाचा: