एक्स्प्लोर

मनसे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेत, संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे यांच्या पक्षाला जाण नाही, ओढून ताणून बनवलेले हे पक्ष आहेत. त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार , असा टोला संजय राऊतांनी लगावला.  

Sanjay Raut on Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. मनसे, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झाले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे. मनसेमध्ये अस्वस्थता आहे का? असा सवाल संजय राऊतांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी जोरदार हल्लाबोल करत टीकेचा बाण सोडला. 

 सुपाऱ्या घेऊन पक्ष निर्माण झालेत - संजय राऊत 

जेव्हा पक्ष जागेवर असेल तेव्हाच मनसेमध्ये अस्वस्थता असेल. एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे यांच्या पक्षाला जाण नाही, ओढून ताणून बनवलेले हे पक्ष आहेत. त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार , असा टोला संजय राऊतांनी लगावला.  

मनसे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर हल्ले करा आणि त्यांना कमजोर करा, हे त्यांना काम दिलेले आहे. या तिन्ही पक्षांना यासाठी सुपाऱ्या दिल्या आहेत. या सुपार्‍या त्यांनी यासाठी स्वीकारल्या आहेत,  कारण त्यांना सांगितलं आहे की नाही तर तुम्हाला आम्ही तुरुंगात पाठवू, असेही संजय राऊत म्हणाले. 

तोपर्यंतच मोदी सरकार राहील - राऊत 

चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या मेहेरबानीवर मोदी सरकार आहे, पण त्यांना मोठं मंत्रालय मिळालं नाही. भाजपने सर्व मोठी खाती स्वतःकडे ठेवली आहेत, असे संजय राऊत म्हणाले. आता एनडीए सरकार मध्ये आम्ही मोदींना प्रश्न विचारणार नाहीत. आम्ही चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना प्रश्न विचारणार आहोत, कारण या दोघांचा संयोग सरकार बनवण्यासाठी आहे. त्यांच्याशिवाय  नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नव्हते.  नरेंद्र मोदी यांची सत्ता ही उधार सत्ता आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांची मेहरबानी राहील तोपर्यंत ही सत्ता राहील, असे संजय राऊत म्हणाले.   

चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, पासवान आणि मांझी यांना काय मिळालं ? कोणते मोठे मंत्रालय मिळाले ? कोणाला काही मिळाले नाही, फक्त भाजपने आपापसात वाटून घेतला आहे.  हे सरकार टिकणार नाही आजपासून कोणत्याच पक्षाला मोठे मंत्रिपद मिळाले नाही, असा दावा राऊतांनी केलाय. 

आणखी वाचा :

मोदी-शाह नव्हे तर केंद्रात दुसरे दोन अतृत्प आत्मे, संजय राऊतांनी नावं सांगितली

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget