Sanjay Raut on Amit Thackeray : अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य; माहीममध्ये मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता
Sanjay Raut on Amit Thackeray, Mumbai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांन माहीममधील मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Sanjay Raut on Amit Thackeray, Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अमित ठाकरे यांच्यासमोर शिदेंचे उमेदवार सदा सरवणकर आणि ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांचं कडवं आव्हान असणार आहे. त्यांनी अमित ठाकरेंना दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
संजय राऊत काय काय म्हणाले?
अमित ठाकरेंच्या माहीमधील उमेदवारीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, माहीमध्ये पाठिंबा हवा असेल तर चर्चेची दार उघडी आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पुतण्या अमित ठाकरे यांना निवडणुकीत पाठिंबा देणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे ही लोकभावना
संजय राऊत म्हणाले, 3 पक्षांनी मिळून बसून 12-12 तास चर्चा करून यादी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराजी कुठेही नाही. तिढा असणारचं, तीन पक्ष सोबत आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात. दोन पक्ष असल्यावर ठीक, पण तीन पक्ष असल्यावर प्रत्येकाला वाटत आपणच जागा जिंकणार आहोत. महाविकास आघाडीत जागा वाटप करणे इतकं सोप्प नसतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे ही लोकभावना आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते आमचे राजकीय शत्रू आहेत.
वडापाव खायचा आणि पक्षाचं काम करायचं
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, वडापाव हा मी सगळीकडे शोधतो, शिवसेना शाखेच्या बाहेर अजूनही वडापावचा गाडा असतो. वडापाव खायचा आणि पक्षाचं काम करायचं. उद्धव ठाकरे यांचा आवडीचा वडापाव शिवाजी पार्क जवळचा वडापाव आहे. महापौर बंगल्यात गेलो तेव्हा तो वडापाव खायचो. कीर्ती कॉलेजचा वडापाव मी आणायला सांगायचो.
राहुल गांधी नाराज होणारा माणूस नाही
परांडा हा सेनेचा मतदार संघ आहे. तिथे आमचा आमदार निवडून आलेला आहे. 29 आणि 4 नोव्हेंबरपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकतो. अर्ज मागे घ्यायची तारीख 4 नोव्हेंबर आहे. पत्र काँग्रेसने लिहिलं म्हणजे ते काही लेटर बॉम्ब नाही, आम्ही सुद्धा पत्र देतो. पत्र तुम्ही नीट पाहा त्यात लिहिलंय ह्या ह्या जागा आम्हाला पाहिजे. राहुल गांधी नाराज होणारा माणूस नाही, ते राष्ट्रीय मुद्यावर नाराज होतात. जागा वाटपावर ते नाराज होणार नाहीत. आम्ही सुद्धा राहुल गांधी यांच्या संपर्कात असतो. त्यांच्या बैठकामध्ये चर्चा होतं असेल, ही जागा हवी आहे ती जागा हवी आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
यादी एडिट करावी लागेल त्यात गांभीर काय? कोरेगाव मतदारसंघ आम्ही राष्ट्रवादीला देतोय सातारा मतदार संघ आम्ही घेतला. तिथे राष्ट्रवादीचा शशिकांत शिंदे चांगला उमेदवार आहे. ती जागा आमच्याकडे होती ती त्यांना देतोय. जागा वाटप करायला शिवसेना कधीच दिल्लीत गेली नाही. शिंदे अजूनही अमित शाह यांना भेटायला हिरवळीवर जाऊन बसतात. त्यांना जागा घ्यायला उठाबश्या काढव्या लागतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या