एक्स्प्लोर

Vidhansabha By Election Result: अंधेरी पूर्वसह सहा राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांचा आज निकाल

Assembly By Election 2022: अवघ्या राज्यच लक्ष लागू राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.

Assembly By Election 2022: अवघ्या राज्यच लक्ष लागू राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मनाला जात आहे. कारण त्यांच्या विरोधात कोणत्याही मुख्य पक्षांनी आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला नाही. यातच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालसह आज सहा राज्यांमधील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांसाठी मतमोजणी होणार आहे. 

या पोटनिवडणुकीत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या आदमपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. भजनलाल यांची नात भव्या बिश्नोई (आदमपूर विधानसभा मतदारसंघ, हरियाणा) आणि अनंत सिंग यांची पत्नी नीलम देवी (मोकामा विधानसभा मतदारसंघ, बिहार) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज त्यांचे  भवितव्य ठरणार आहे. बिश्नोई भाजप, तर नीलम राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. अनंत सिंह यांना अपात्र ठरवल्यानंतर बिहारमधील मोकामा जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागली.

याशिवाय बिहारमधील गोपालगंज, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. ज्या सात जागांवर भाजप आणि प्रादेशिक पक्षात लढत आहेत. त्यापैकी तीन जागा भाजपकडे, तर दोन काँग्रेसकडे होत्या. तसेच शिवसेना आणि आरजेडी प्रत्येकी एक जागा मिळाली होती.

बिहार पोटनिवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि आरजेडीमध्ये आहे. तर हरियाणात भाजप, काँग्रेस, आयएनएलडी आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात आहे. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि ओडिशात बीजू जनता दल (बीजेडी) यांच्या विरोधात भाजप आहे. 

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा धाकटा मुलगा कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आदमपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. आदमपूरची जागा 1968 पासून भजनलाल कुटुंबाच्या ताब्यात आहे. आदमपूर मतदारसंघातून दिवंगत माजी मुख्यमंत्री भजनलाल हे नऊ वेळा आमदार होते. त्यांची पत्नी जसमा देवी एकदा आणि मुलगा कुलदीप चार वेळा आमदार होते. बिहारच्या गोपालगंज मतदारसंघातून भाजपने दिवंगत आमदार सुभाष सिंह यांच्या पत्नी कुसुम देवी यांना उमेदवारी दिली आहे. आरजेडीने येथून मोहन गुप्ता यांना उमेदवारी दिली असून बसपाने इंदिरा यादव यांना येथून उमेदवारी दिली आहे. इंदिरा या माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचे मेहुणे साधू यादव यांच्या पत्नी आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण, 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध; सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहनVinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget