एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2022 Live Update : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार; संजय राऊत यांचा विश्वास

Rajya Sabha Election 2022 Live Update : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. यासाठी लागणारी जुळवाजुळव सुरु आहे. यासंबंधी प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Key Events
Rajya Sabha Election 2022 Live Update Maharashtra Politics news Rajya Sabha Election voting counting of votes results shiv sena bjp congress Rajya Sabha Election 2022 Live Update : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार; संजय राऊत यांचा विश्वास
Rajya Sabha Election 2022 Live Update

Background

Rajya Sabha Election 2022:  राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय झाले, याची माहिती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने दिली. महाविकास आघाडीने दिलेल्या ऑफरबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. भाजप राज्यसभेसाठी आग्रही असल्याचीही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्तावही महाविकास आघाडीने भाजपला दिला. 

भाजपने काय म्हटले?

महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  राज्यसभेची तुम्ही ही जागा आम्हाला सोडा आम्ही तुम्हाला विधानं परिषदेची एक जास्तीची जागा देऊ असा प्रस्ताव दिला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आमची चर्चा चांगली झाली आहे. फडणवीस यांचे म्हणणे पक्ष श्रेष्ठींना सांगणार असून दुपारी तीन वाजता चित्र स्पष्ट होईल असेही भुजबळ यांनी म्हटले. 

मुख्यमंत्र्यांची घटक पक्ष आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर आम्ही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यासाठीं गेलो होतो अशी माहिती शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी दिली. 

संख्याबळानुसार काय स्थिती?

विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस  आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13  च्या आसपास मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक झाल्यास ती अटीतटींची होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

15:28 PM (IST)  •  03 Jun 2022

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होणार; संजय राऊत यांचा विश्वास

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. अपक्षांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी मविआचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते असेही राऊत यांनी म्हटले. 

14:38 PM (IST)  •  03 Jun 2022

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणूक होणारच, शिवसेनाही उमेदवार मागे घेणार नाही,सूत्रांची माहिती

Rajya Sabha Election 2022:  राज्यसभा निवडणूक होणारच, शिवसेनाही उमेदवार मागे घेणार नाही,सूत्रांची माहिती, घोडेबाजार टाळण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अपयशी

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोहिते पाटील म्हणाले कुर्डूत बीडपेक्षा भयानक दहशत, ग्रामस्थ आक्रमक, निषेधार्थ  कुर्डू बंदची हाक
मोहिते पाटील म्हणाले कुर्डूत बीडपेक्षा भयानक दहशत, ग्रामस्थ आक्रमक, निषेधार्थ  कुर्डू बंदची हाक
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ट्रक अन् टेम्पोची समोरासमोर धडक; टँकरखाली दबून दोघे ठार
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ट्रक अन् टेम्पोची समोरासमोर धडक; टँकरखाली दबून दोघे ठार
उपसरपंचाने जीव संपवला, नर्तिकेच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ; दोन दिवसांत किती वाढले चाहते?
उपसरपंचाने जीव संपवला, नर्तिकेच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ; दोन दिवसांत किती वाढले चाहते?
16 लाखांच्या बाईकवरुन 'भंगार' रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी
16 लाखांच्या बाईकवरुन 'भंगार' रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोहिते पाटील म्हणाले कुर्डूत बीडपेक्षा भयानक दहशत, ग्रामस्थ आक्रमक, निषेधार्थ  कुर्डू बंदची हाक
मोहिते पाटील म्हणाले कुर्डूत बीडपेक्षा भयानक दहशत, ग्रामस्थ आक्रमक, निषेधार्थ  कुर्डू बंदची हाक
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ट्रक अन् टेम्पोची समोरासमोर धडक; टँकरखाली दबून दोघे ठार
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, ट्रक अन् टेम्पोची समोरासमोर धडक; टँकरखाली दबून दोघे ठार
उपसरपंचाने जीव संपवला, नर्तिकेच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ; दोन दिवसांत किती वाढले चाहते?
उपसरपंचाने जीव संपवला, नर्तिकेच्या इंस्टा फॉलोअर्समध्ये अचानक वाढ; दोन दिवसांत किती वाढले चाहते?
16 लाखांच्या बाईकवरुन 'भंगार' रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी
16 लाखांच्या बाईकवरुन 'भंगार' रिलस्टार करायचा स्टंट, मुलींना छेडायचा; अटकेनंतर हात जोडून मागितली माफी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2025 | गुरुवार
छगन भुजबळ म्हणाले लोकशाही आहे, 'जरांगेशाही' नाही; आता पाटलांचा पलटवार, आरक्षण GR वरुन दोघांमध्ये जुंपली 
छगन भुजबळ म्हणाले लोकशाही आहे, 'जरांगेशाही' नाही; आता पाटलांचा पलटवार, आरक्षण GR वरुन दोघांमध्ये जुंपली 
Nepal Protest: नेपाळ हिंसाचारात काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या 5 अब्ज रुपयांच्या सर्वात उंच आलिशान हिल्टन हॉटेलची राखरांगोळी; विमा कंपन्यांकडे किती अब्ज रुपयांचा दावा होणार? 2015 मधील भूकंपाच्या तिप्पट रक्कम!
नेपाळ हिंसाचारात काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या 5 अब्ज रुपयांच्या सर्वात उंच आलिशान हिल्टन हॉटेलची राखरांगोळी; विमा कंपन्यांकडे किती अब्ज रुपयांचा दावा होणार? 2015 मधील भूकंपाच्या तिप्पट रक्कम!
उपराष्ट्रपतींसाठी मतदान करुन परतताना भीषण अपघात, काँग्रेस खासदार थोडक्यात बचावले; हायवेवर पोलीस धावले
उपराष्ट्रपतींसाठी मतदान करुन परतताना भीषण अपघात, काँग्रेस खासदार थोडक्यात बचावले; हायवेवर पोलीस धावले
Embed widget