एक्स्प्लोर
Advertisement
अशोक चव्हाण आणि माझ्य़ात कुठलाही वाद नाही, वादाच्या बातम्या केवळ मीडियाचा विषय : राजीव सातव
येणाऱ्या काळात हिंगोली जिल्ह्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे. हिंगोलीच्या जनतेचा भ्रमनिरास होऊ देणार नाही. तर आश्चर्य वाटणारे निकाल गुजरातमधून मिळतील असा सुतोवाच राजीव सातव यांनी केला आहे.
नवी दिल्ली : 2014 ला मोदींची लाट असतानाही हिंगोली मतदारसंघातून जनतेने मला आशीर्वाद देत विजयी केलं आहे. सध्या पक्षाने मला गुजरातची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला निवडणूक न लढण्याचा आदेश पक्षाने दिला आहे. म्हणूनच मी हिंगोलीमधून ते निवडणूक लढणार नसल्याचे काँग्रेस नेते राजीव सातव यांनी स्पष्ट केलं आहे.
मला निवडणूक न लढण्याचा आदेश पक्षाने दिला आहे. पण हिंगोलीचे नवे उमेदवार सुभाष वानखेडे नक्की निवडून येतील असा विश्वास सातव यांनी व्यक्त केला आहे. अशोक चव्हाण आणि आमच्यात कुठला वादाचा विषय नाही. त्यांनी आजवर मला सहकार्य केलं आहे. आमच्या आणि चव्हाण यांच्या वादाच्या बातम्या केवळ मीडियाचा विषय असल्याचं सातव म्हणाले.
VIDEO | काँग्रेस नेते राजीव सातव यांच्याशी संवाद | नवी दिल्ली | एबीपी माझा
मी हिंगोलीतून लढाव यासाठी अशोक चव्हाण प्रचंड आग्रही होते मात्र अंतिम निर्णय राहुल गांधींनी घेतला. मला राज्यातील राजकारणात येणे हा काही माझा अजेंडा नाही आहे. राष्ट्रीय स्तरावरच काम करायची भूमिका असल्याचे राजीव सातव यांना स्पष्ट केलं.
येणाऱ्या काळात हिंगोली जिल्ह्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे. हिंगोलीच्या जनतेचा भ्रमनिरास होऊ देणार नाही. तर आश्चर्य वाटणारे निकाल गुजरातमधून मिळतील असा सुतोवाच राजीव सातव यांनी केला आहे.
संबंधित बातम्या
माझं पक्षात कुणीही ऐकत नाही, अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत?
तोंडी परीक्षा : महाआघाडीत मनसेला स्थान नाही : अशोक चव्हाण
गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी राजीव सातव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement