एक्स्प्लोर

Rajasthan Election Result 2023 Live Update : राजस्थानमध्ये भाजपचे सरकार, अशोक गेहलोतांनी राज्यपालांकडे सोपावला राजीनामा

Rajasthan Assembly Election Results 2023:  राजस्थानमध्ये भाजपने सत्ता काबिज केली असून काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

LIVE

Key Events
Rajasthan Election Result 2023 Live Update : राजस्थानमध्ये भाजपचे सरकार, अशोक गेहलोतांनी राज्यपालांकडे सोपावला राजीनामा

Background

मुंबई : राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान करण्यात आले. त्यामुळे आता संपूर्ण जनेतसह राजकारणी देखील 3 डिसेंबरची वाट पाहत आहे. दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेस आपली सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार भाजप बाजी मारणार हे अवघ्या काही वेळात स्पष्ट होईल. 

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा आहेत. एका उमेदवाराच्या निधनामुळे इथे यंदा 199 जागांसाठी मतदान होत आहे. याआधी 2018 मध्ये, 200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेच्या  निवडणुकीत काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून रिंगणात होता. 39.8 टक्के मतांसह 99 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 100 जागांच्या बहुमताच्या आकड्यासाठी काँग्रेसला केवळ एक जागा कमी पडली. तेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप मतांच्या संख्येत अल्प फरकानं मागे पडला होता. काँग्रेसच्या 39.8 टक्के मतांच्या तुलनेत भाजपची मतं 39.3 टक्के होती. तर, निवडणुकीत भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, भाजपच्या वसुंधरा राजे सिंधिया, राज्यवर्धन सिंह राठोड, गोविंद सिंग दोतसारा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने राजस्थानची सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला आहे. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी उमेदवारांसाठी प्रचार केला. 

Election Results 2023, Elections 2023, Election 2023, Rajasthan Election Result 2023, Rajasthan Assembly Election Results 2023

23:21 PM (IST)  •  03 Dec 2023

Rajasthan Election Result Live :  हा पंतप्रधान मोदींच्या सुशासनाचा विजय, अर्जुन राम मेघवाल यांची प्रतिक्रिया 

राजस्थानसह तीन राज्यांतील भाजपच्या विजयाबाबत केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, "तीन राज्यात स्पष्टपणे भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. आम्ही तेलंगणातही प्रगती केली आहे. आमचे दोन खांब म्हणजे विकास आणि सुशासन आणि पंतप्रधान मोदींचे उत्कृष्ट नेतृत्व. सुशासन आणि विकासामुळे आम्हाला हा विजय मिळाला आहे.

23:20 PM (IST)  •  03 Dec 2023

21:20 PM (IST)  •  03 Dec 2023

Rajasthan Election Result Live : मी राजस्थानसाठी माझे नियम बदलले: नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी नेहमी भाकितांपासून दूर राहिलो... मी कधीही मोठी आश्वासने किंवा घोषणा केल्या नाहीत. पण यावेळी निवडणुकीत मी माझा हा नियम मोडला. मी राजस्थानबाबत भाकीत केले होते की, राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय होईल. सरकार परत येणार नाही..."

20:47 PM (IST)  •  03 Dec 2023

Rajasthan Election Result Live : अशोक गेहलोत सरदारपुरा येथून विजयी 

राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे, मात्र अशोक गेहलोत आपली जागा वाचवण्यात यशस्वी झाले आहेत. पुन्हा एकदा ते सरदारपुरामधून विजयी झाले आहेत. गेहलोत यांनी भाजपचे महेंद्र राठोड यांचा 26,396 मतांनी पराभव केला आहे. अशोक गेहलोत सलग सहा वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. 

18:48 PM (IST)  •  03 Dec 2023

Rajasthan Election Result Live : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द 

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. राज्यात भाजपने आतापर्यंत 104 जागा जिंकल्या असून 11 जागांवर आघाडीवर आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special ReportFadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special ReportShivraj Rakshe Maharashtra Kesari : आखाड्यात कुस्ती हरली? राजकीय आखाडा कुणामुळे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget