एक्स्प्लोर

Rajasthan Assembly Election: राजस्थानात 23 नोव्हेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निवडणूक निकाल; अशोक गेहलोत सरकार टिकवणार की भाजप मैदान मारणार?

Rajasthan Assembly Elections: आगामी निवडणुकीत राजस्थानात सत्तेची खुर्ची कोण काबीज करणार? अशोक गेहलोत आणि भाजप यांच्या या थेट लढतीत हनुमान बेनिवाल कसे महत्त्वाचे ठरणार?

Rajasthan Assembly Elections 2023: निवडणूक आयोगानं (Election Commission) राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम (Rajasthan Assembly Elections Schedule) जाहीर केला आहे. राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 200 जागा असलेल्या राजस्थानच्या विधानसभेसाठी 23 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे, तर 3 डिसेंबर रोजी राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जाईल. राज्यातील 199 जागांसाठी तब्बल पाच कोटी मतदार मतदान करणार आहेत. राजस्थानची ही निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी होऊ घातलेल्या या निवडणुका काँग्रेससोबतच भाजपसाठीही महत्त्वाच्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. 

गेल्या 25 वर्षात भाजप मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा नसताना पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्याचबरोबर सत्ताधारी काँग्रेस मुख्यमंत्री गेहलोत यांच्याऐवजी सामुहिक नेतृत्त्वात निवडणूक रिंगणात उतली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि अशोक गेहलोत हे पक्क समीकरण झालं आहे. तरिदेखील गेहलोत यांच्या नेतृत्त्वात निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय काँग्रेसनं नेमका का घेतला? याबाबत अनेक तर्कवितर्क सध्या राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. 

कोणत्या राज्यात कधी मतदान? (Five State Voting & Counting Dates)

  • मिझोराम : 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram Voting Date)
  • छत्तीसगड : 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh Voting Date)
  • मध्यप्रदेश : 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh Voting Date)
  • राजस्थान : 23 नोव्हेंबर रोजी  मतदान (Rajasthan Voting Date)
  • तेलंगाणा : 30 नोव्हेंबर रोजी मतदान

पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी

2018 मध्ये काँग्रेस बहुमताच्या आकड्यापेक्षा मागे, पण तरीही... 

2018 मध्ये, 200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेच्या 199 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून रिंगणात होता. 39.8 टक्के मतांसह 99 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 100 जागांच्या बहुमताच्या आकड्यासाठी काँग्रेसला केवळ एक जागा कमी पडली. तेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप मतांच्या संख्येत अल्प फरकानं मागे पडला होता. काँग्रेसच्या 39.8 टक्के मतांच्या तुलनेत भाजपची मतं 39.3 टक्के होती. तर, निवडणुकीत भाजपला 73 जागा मिळाल्या होत्या.

राजस्थान निवडणुकीत बसपाचे सहा आमदार चार टक्के मतांनी विजयी झाले होते. हनुमान बेनिवाल यांच्या पक्षाला आरएलपीला 2.4 टक्के मतांसह तीन जागा मिळाल्या होत्या. 9.6 टक्के मतांसह 13 अपक्ष आणि 4.9 टक्के मतांसह इतर पक्षांचे पाच उमेदवारही निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले.

यंदाच्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत बेनिवाल यांच्या आरएलपीकेड लक्ष 

हनुमान बेनिवाल यांचा पक्ष RLP राजस्थानच्या 2018 च्या निवडणुकीत तसा नवाच होता. बेनिवाल यांनी 2018 च्या निवडणुकीपूर्वीच पक्ष स्थापनेची घोषणा केली होती. पण, यंदाच्या निवडणुकीत बेनिवाल यांचा पक्ष पाच वर्षांचा झाला आहे. पाच वर्षांत राजस्थानमध्ये अनेक बदल झाले आहेत. बेनिवाल यांनी घोषणा केली आहे, आरएलपी कोणत्याही पक्षाशी युती न करता निवडणूक रिंगणात उतरणार आहे. अशा स्थितीत ही निवडणूक भाजप आणि काँग्रेससाठीच नव्हे तर बेनिवाल यांच्यासाठीही आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी आव्हानात्मक असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget