एक्स्प्लोर

Rajasthan Election Result : राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवाची मुख्य कारणे कोणती? 'हे' आहेत पाच कारणं?

Rajasthan Assembly Election Results 2023 : ताज्या ट्रेंडवरून राजस्थान राज्यातील काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Rajasthan Assembly Election Results) सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विरोधी पक्षात असलेला भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमतासह सत्तेत परतताना दिसत आहे. भाजप 117 जागांवर आघाडीवर आहे. ताज्या ट्रेंडनुसार सत्ताधारी काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे ताज्या ट्रेंडवरून राजस्थान राज्यातील काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत. या पराभवाचे कारणं काय? काँग्रेसचा पराभव होत असेल तर त्याची पाच कारणे कोणती? जाणून घेऊ यात...

गटबाजी: विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेस पक्षात गटबाजी पाहायला मिळत होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादाचा परिणाम कार्यकर्त्यांवरही झाला आणि जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला. मात्र, निवडणुकीपूर्वीच दोन्ही नेते आम्ही एकत्र आहोत, असा संदेश देताना दिसले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मोदी विरुद्ध गेहलोत निवडणूक : राजस्थानमध्ये मोदी विरुद्ध गेहलोत अशी निवडणूक काँग्रेसला महागात पडतांना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याने काँग्रेसच्या जात जनगणनेच्या मुद्याला देखील अयशस्वी ठरवलं. पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये निवडणूक रॅली घेतल्या, तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचाराचा भार सीएम गेहलोत यांच्या खांद्यावर अधिक असल्याचे दिसून आले. राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले पण तेही मोजक्याच ठिकाणी. निवडणूक पूर्णपणे मोदी विरुद्ध गेहलोत अशी झाली आणि भाजपलाही याचा फायदा झाला. 

कन्हैयालाल खून प्रकरणाचा मोठा परिणाम : राजस्थान निवडणुकीत भाजपने उदयपूरच्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा बराच उचलून धरला. भाजपची ही रणनीतीही प्रभावी ठरताना दिसत आहे. मारवाड भागात उदयपूर येते. जो मेवाड जिंकतो तो राजस्थान जिंकतो असे राजस्थानच्या राजकारणात म्हटले जाते. तर, कन्हैयालाल खून प्रकरणासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा भाजपने उचलून धरला आणि त्याचाच फायदा भाजपला होतांना दिसत आहे. 

पेपर लीक आणि लाल डायरी : अशोक गेहलोत यांच्या सरकारने निवडणुकीपूर्वी अने योजनांची घोषणा केली. चिरंजीवी योजनेंतर्गत त्यांनी आरोग्य विम्याची मर्यादा 50 लाखांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले. पण त्यांच्या योजनांवर पेपर लीक प्रकरण, लाल डायरीची चर्चा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पडदा पडला. 

बंदोखोरीचा मोठा फटका: काँग्रेसच्या पराभवामागे बंडखोर हेही प्रमुख कारण मानले जात आहे. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने अनेक नेत्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काहींनी भाजप आणि इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूकही लढवली. या बंडखोरांनी काँग्रेसलाही खिंडार पाडले. याउलट भाजपने प्रत्येक बंडखोराला मनवण्याची जबाबदारी बड्या नेत्यांवर दिली आणि त्यांना मनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अनेक बंडखोरांनी सहमती दर्शवल्याने भाजपला याचा फायदा होताना दिसत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Election Results 2023 LIVE updates : मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजप मजबूत, तेलंगणात काँग्रेस; छत्तीसगडमध्ये निकराची लढत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget