एक्स्प्लोर
मनसेचं इंजिन यार्डात, लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाचे स्पष्टीकरण, पाठिंब्याबाबत गुपित कायम
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लोकसभा निवडणूक लढणार की नाही, हे कोडं अखेर सुटलं आहे. मनसे पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं पत्रकं मनसेकडून जारी करण्यात आले आहे.
मुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लोकसभा निवडणूक लढणार की नाही, हे कोडं अखेर सुटलं आहे. मनसे पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं पत्रकं मनसेकडून जारी करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मनसे कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत चर्चा सुरु होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबाबत काय भूमिका घेतात याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांसह सामान्यांचेही लक्ष लागले होते. अखेर चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले. अनेक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या याद्यादेखील जाहीर केल्या आहेत. परंतु मनसेने अद्याप लोकसभा निवडणुकीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली नव्हती. परंतु आता मनसेने निवडणुकीतून माघार घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 मार्चला मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ठाकरे मोठी घोषणा करतील असे बोलले जात होते. परंतु, आता या मेळाव्यात राज ठाकरे एखाद्या पक्षाला पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देतील, असेही बोलले जात आहे.
VIDEO
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची "लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९" लढविणार नाही, बाकी १९ मार्च २०१९ ला बोलूच... जय महाराष्ट्र!#LokSabhaElections2019 pic.twitter.com/tq8La2y4qt
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
राजकारण
Advertisement