मैदान तेच, उमेदवारही तेच, तटकरे की गीते? कोण करणार 'रायगड' सर?
ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आपल्या उमेदवारांची पहिली यादी (Shivsena UBT First List) जाहीर केलीय. यामध्ये 17 जागांवरील नावे जाहीर करण्यात आली आहेत. Shiv Sena UBT Canditates
Raigad Loksabha Election Shiv Sena UBT Canditates : ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आपल्या उमेदवारांची पहिली यादी (Shivsena UBT First List) जाहीर केलीय. यामध्ये 17 जागांवरील नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामधील महत्वाचे नाव म्हणजे अनंत गीते, अनंत गीते (Anant Gite) यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Loksabha Election) ठाकरेंनी पुन्हा मैदानात उतरवले आहे. त्यामुळं आता रायगड लोकसभा मतदारसंघात मैदान तेच, उमेदवारही तेच आहेत. त्यामुळं आता अनंत गीते की सुनिल तटकरे (Sunil Tatkare) रायगड सर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी पुन्हा अनंत गीतेंना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनिल तटकरे मैदानात उतरले आहेत. त्यामुळं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार मैदानात होते, तेच उमेदवार पुन्हा आमने-सामने आले आहेत. दरम्यान, 16 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असली तरी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: