एक्स्प्लोर

Pune Gram Panchayat Election Result 2022 LIVE : दौंड, इंदापूर आणि बारामती मतदान मोजणी पूर्ण

Pune Gram Panchayat Election Result 2022 LIVE : पुणे जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायतींच्या (gram Panchayat Election Results 2022) सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे .

LIVE

Key Events
Pune Gram Panchayat Election Result 2022 LIVE : दौंड, इंदापूर आणि बारामती मतदान मोजणी पूर्ण

Background

Pune Gram Panchayat Election Result 2022 :  पुणे जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायतींच्या (gram Panchayat Election Results 2022) सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे. त्यानंतर अर्ध्या तासांतच निवडणुकीचे निकाल लागतील. निकालामुळे मतमोजणी केद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 80.79 टक्के मतदान झालं होतं. त्यात अडीच लाखाहून अधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

16:39 PM (IST)  •  20 Dec 2022

अजित पवारांंनी 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला

पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन दादांमध्ये लढत होती. यात अजित दादांनी 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, सुनील शेळके, अतुल बेनके यांच्या तालुक्यांचा ही मोठा वाटा राहिलेला आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी स्वतः प्रचार केला असताना ही भाजपला अवघ्या 38 ठिकाणी विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हा भाजपला धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडाचं शस्त्र उगरल्यानंतर ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत, शिंदे गटाला मात्र तीन ग्रामपंचायतीत विजय मिळवून समाधान मानावे लागलेलं आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भोर आणि वेल्हा तालुक्यात अपेक्षेनुसार गड राखलेला आहे.

15:01 PM (IST)  •  20 Dec 2022

इंदापूर तालुक्याती भाजपला 11 राष्ट्रवादीला 8 तर स्थानिक आघाडीला 7 जागेवर विजय

इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीचा मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपला 11 जागा राष्ट्रवादीला 8 जागा तर स्थानिक आघाडीला 7 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत झाली यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भरणेवर आघाडी मिळवलेली आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी स्थानिक आघाडी झाली. त्यामुळे सरपंच स्थानिक आघाडीचा झाला असला तरी आतली सदस्य संख्या ही वेगवेगळ्या पक्षात विभागली गेली आहे. बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. यामध्ये तेरा ठिकाणी राष्ट्रवादीने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. तर दुसरीकडे दौंड तालुक्यातील 8 ग्रामंचायत मध्ये मतमोजणी पार पडली. त्यामध्ये भाजपला 6 जागा तर राष्ट्रवादीला 1 आणि काँग्रेसला एक जागा मिळाली. त्यामुळे राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांना पराभूत केलं.

15:00 PM (IST)  •  20 Dec 2022

हवेली तालुक्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादी तर भाजपला 3 ठिकाणी विजय तर 3 जागा शिवसेना ठाकरे गटाकडे

Pune Gram Panchayat Election Result 2022 live :हवेली तालुक्यातील 7व्या आणि शेवटच्या गावाचा निकाल जाहीर झाला आहे. गोगलवाडीच्या सरपंच पदी अश्विनी गोगावले विराजमान होणार आहे. अश्विनी गोगावले या अशोक गोगावले  यांच्या पत्नी असून त्या काळूबाई माता ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आहेत. हवेली तालुक्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादी तर भाजपला 3 ठिकाणी विजय तर 3 जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्या आहेत.

13:31 PM (IST)  •  20 Dec 2022

दौंड तालुक्यात भाजपचं वर्चस्व

दौंड तालुक्यातील सहा जागा या भाजपला, एक राष्ट्रवादीला तर स्थानिक आघाडीला एक जागा मिळालेली आहे.

13:22 PM (IST)  •  20 Dec 2022

शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी

Pune Gram Panchayat Election Result 2022 live :शिरूर तालुक्यात एकूण ४ ग्रामपंचायतचे निकाल हाती लागले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले असून शिंदे गटाला 1 ठिकाणी यश आले तर1 ठिकाणी स्थानिक गटाने विजय मिळवला आहे

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget