Karuna Sharma : 'तो' राक्षस, माझी उमेदवारी अवैध ठरवली, तुझा पराभव ठरलेला आहे; करुणा शर्मा ढसाढसा रडल्या
Karuna Sharma, परळी : परळीतून भरलेला उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर करुणा शर्मा यांनी खदखद व्यक्त केली आहे.
Karuna Sharma, परळी : परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा शर्मा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. दरम्यान, अर्ज बाद ठरवण्यात आल्यानंतर करुणा शर्मा चांगल्याच संतापल्या आहेत. शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये त्यांनी खदखद बोलून दाखवली आहे.
परळीतील अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता
करुणा शर्मा म्हणाल्या, महाराष्ट्रात लोकशाही संपलेली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीच राहिलेली नाही. मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. परळीत सुरु असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा सपोर्ट नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून फॉर्म भरला होता.
View this post on Instagram
तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे, तू एका महिलेला भीत आहेस
पुढे बोलताना शर्मा म्हणाल्या, तो राक्षस आहे. मी 26 वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं. एक महिला स्वत:चं अस्तित्व गमावून, पतीचं अस्तित्व बनवत असते. तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही तर तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे. तू एका महिलेला भीत आहेस. याचा इतिहास साक्षी आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या