एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अडीच महिन्यांचा आमदार नको, काटोलमध्ये पोटनिवडणूक टाळण्यासाठी पक्षांची धावाधाव
अडीच महिन्यासाठी होणारा आमदार टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा आटापिटा सुरु आहे.
नागपूर : कोणत्याही पक्षाने पुढील महिन्यात होणारी काटोलची विधानसभा पोटनिवडणूक लढू नये अशा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. दुसरीकडे भाजपही काटोल पोटनिवडणूक रद्द करावी म्हणून कोर्टात गेले आहे. कारण 11 एप्रिलला काटोल विधानसभेची होणारी पोटनिवडणूक फक्त अडीच महिन्यासाठी होणार आहे.
भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही कोर्टाचं दार ठोठावले आहे आणि निवडणूक घेऊ नये म्हणून एक अपील निवडणूक आयोगाकडेही दाखल केलं आहे. अडीच महिन्यासाठी होणारा आमदार टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा आटापिटा सुरु आहे.
आशिष देशमुख हे काटोलचे भाजपातून निवडून आलेले आमदार होते. मात्र त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काटोलमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आजपर्यंत भाजपाने काटोलमध्ये पोटनिवडणूक होऊ नये यासाठी बरेच प्रयत्न केले, पण तरीही निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे. उमेदवार, शासन या सर्वांच्याच पैसा आणि यंत्रणांचा गैरवापर होईल या मुद्द्यावरुन भाजपने कोर्टात धाव घेतली आहे.
काटोल विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी 23 मे रोजी झाली तरीही नवीन आमदाराचा शपथविधी हा पावसाळी अधिवेशनात होईल आणि येत्या राज्याच्या निवडणुकीची सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. काटोल विधानसभा क्षेत्रातून 2014 पर्यंत तब्बल 20 वर्ष अनिल देशमुख हे निवडून आले आहेत. गेल्या 2014 च्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते. यावेळी त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली असली तरी पैसे आणि व्यवस्थेचा भार लक्षात घेता कोणीच उमेदवार उभा करु नये असा पर्याय त्यांच्याच पक्षश्रेष्ठींनी दिला आहे.
दरम्यान येत्या सोमवारी भाजपाची ही याचिका कोर्टात ऐकली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता खरंच काटोलची ही निवडणूक होते की अडीच महिन्यांचा आमदार टळतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
जॅाब माझा
Advertisement