एक्स्प्लोर
सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, नांदेडच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
काँग्रेसची नाव आता बुडणार आहे. या नावेत बसलेले बाकीचे लोकंही बुडणार आहेत, असेही ते म्हणाले. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, राजीव सातव हे निवडणूक न लढविता आधीच मैदान सोडून पळाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
नांदेड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या सभेत मराठी भाषेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मराठी भाषेतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी इथे आलोय, अशा शब्दात मोदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोदी म्हणाले की, गुढीपाडव्याच्या पवित्रदिनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भेटीला आलोय, महाराष्ट्राचे आशीर्वाद नेहमीच आम्हाला मोठे बळ देतात.
यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेस भारताला कुठे घेऊन जाणार आहे हे देशासमोर आले आहे. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी दोन पंतप्रधान मागत आहेत, अशी टीका केली.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीविषयी रोष आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. वायनाडमधून निवडणूक लढविण्याच्या विषयावरूनही त्यांनी यावेळी टोला लगावला. अमेठीतून राहुल गांधींना निवडणूक लढविणे कठीण आहे, त्यामुळेच सुरक्षित मतदारसंघात पळाले, असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसची नाव आता बुडणार आहे. या नावेत बसलेले बाकीचे लोकंही बुडणार आहेत, असेही ते म्हणाले. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, राजीव सातव हे निवडणूक न लढविता आधीच मैदान सोडून पळाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांमध्ये अनेक गट पडले आहेत. ही एक महामिलावट आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाणांवर देखील टीका केली.
नांदेडमधील महायुतीच्या या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement