एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीर ही केवळ जमीन नव्हे तर भारताचं मस्तक : नरेंद्र मोदी

आम्ही संपूर्ण सावधगिरी बाळगत आम्ही पाच ऑगस्टला कलम 370 आणि 35 ए रद्द करण्याचा निर्णय घेतला. चाळीस वर्षांपासून तिथं अशांतता होती. मी वचन देतो चार महिन्यात काश्मीरातील पूर्वपदावर आणणार, असं मोदी म्हणाले.

जळगाव : लडाख, जम्मू-काश्मीर ही केवळ जमीन नाही तर हे भारताचं मस्तक आहे, देशातील काही राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहेत, अशा शब्दात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 370 च्या मुद्द्याला हात घालत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादी राष्ट्रविरोधी सूर लावत असल्याचं सांगत मोदींनी यावेळी टीका केली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगावात आज मोदींची पहिली प्रचारसभा पार पडली. काही राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहे. मी विरोधकांना आव्हान देतो. मैदानात या. तुमच्यात हिंमत असेल तर कलम 370, 35 ए आणि तिहेरी तलाक निर्णय बदलण्याची जाहिरनाम्यात घोषणा करा, असं यावेळी मादी म्हणाले. कसं काय जळगाव, तुम्ही महाजनादेशाला मतं देणार ना? असं म्हणत आपल्या नेहमीच्या शैलीत मोदींनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केली.  यावेळी मोदी म्हणाले,  गेल्या 70 वर्षांपासून जम्मू काश्मीरातील वाल्मिकी बंधूना जगण्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं गेलं. जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचं शिर आहे. तिथलं संपूर्ण जीवन भारताला मजबूत बनवण्याचं काम करते. आम्ही संपूर्ण सावधगिरी बाळगत आम्ही पाच ऑगस्टला कलम 370 आणि 35 ए रद्द करण्याचा निर्णय घेतला. चाळीस वर्षांपासून तिथं अशांतता होती. मी वचन देतो चार महिन्यात काश्मीरातील पूर्वपदावर आणणार, असं मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, देशातील काही राजकीय पक्ष आणि राजकीय पक्ष राष्ट्रहितासाठी घेतलेल्या या निर्णयाचं राजकारण करत आहे. हे पक्ष महाराष्ट्रात मत मागण्यासाठी येत असून, त्यांच्या मुलाखती बघा. त्यांची भूमिका शेजारी देशाच्या भाषेसारखी आहे. जम्मू काश्मीर विषयी देश जो विचार करतो. त्याच्या उलट विरोधक विचार करतात. देशाच्या भावनेसोबत उभं राहण्यात त्यांना संकोच वाटत आहे, असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरला पूर्वपदावर आणण्यासाठी कटिबद्ध आहे,  मी तुम्हाला वचन देतो, असंही मोदी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरेTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaArjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
×
Embed widget