एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मावळची उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ आणि रोहित पवार म्हणतात...

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवारांनी पक्षाचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तर त्यांचे बंधू रोहित पवार यांनी पार्थ पवार नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे म्हटले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. या यादीत मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवारांनी पक्षाचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तर त्यांचे बंधू रोहित पवार यांनी पार्थ पवार नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे म्हटले आहे.  VIDEO | पार्थ पवार मावळमधून तर शिरुरमधून अमोल कोल्हेंना संधी | मुंबई | एबीपी माझा पक्षनेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार यांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या कार्याची सुरुवात करत आहे. आशाताई पवार आणि अनंतराव पवार यांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत. साहेबांच्या,दादांच्या आणि सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली करण्याचे भाग्य मला मिळत आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनातील वाटचालीत मी यशस्वी होईल, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे. आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहता मला माझ्या कामासाठी आणखी ऊर्जा मिळत आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने व आशीर्वादाने मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकणार, यावर माझा विश्वास आहे. मावळचा दूरगामी विचार आणि शाश्वत विकास करणे, तिथल्या स्थानिकांना न्याय मिळवून देणे, त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे हे विषय माझ्यासाठी प्राधान्याचे राहतील. माझ्या देश बांधवांच्या समस्यांकडे लक्ष देऊन संसदेत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन, पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्की सार्थ ठरवेल, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे. मावळची उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ आणि रोहित पवार म्हणतात... तर रोहित पवार यांनी बंधू पार्थ पवार यांची मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी घोषित करण्यात आल्याचा विशेष आनंद आहे. पार्थ पवार नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतीलच, सोबत मावळ परिसरात विकासकांमांना नवी दिशा देखील मिळेल, असे म्हटले आहे.   लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत. लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक आहे. त्यामध्ये कॉंग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जातील असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. पवार साहेबांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून माढासाठी नाव जाहीर केले जाईल असे सांगतानाच एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल असे  जयंत पाटील यांनी सांगितले. एकूण पाचजणांची नावे दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. माढा आणि नगरच्या उमेदवारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. बीडमधून घोषित झालेल्या बजरंग सोनावणे यांच्या नावावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा होती. काल लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली होती.  ही पहिली यादी असून उर्वरित यादी उद्या आणि परवा घोषित करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी काल सांगितले होते. त्यानुसार आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
 मावळची उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ आणि रोहित पवार म्हणतात...
14 मार्च रोजी पत्रकार परिषदेत मावळ, माढा, अहमदनगर, बीड, गोंदिया येथील उमेदवारांची घोषणा  झालेली नव्हती. काही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याचे चालले आहे, त्यावर चर्चा सुरु असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते.
पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1  अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीने बुलडाणा लोकसभेतून राजेंद्र शिंगणे यांच्या नावाची घोषणा केली आहे. या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून आग्रही आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने सोडली असली तरी स्वाभिमानी अजून 2 जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे यावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तोडगा कसा काढणार याकडे आता लक्ष लागून आहे. पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ ईशान्य मुंबई  - संजय दीना पाटील बारामती - सुप्रिया सुळे बुलडाणा - राजेंद्र शिंगणे सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले कोल्हापूर - धनंजय महाडिक जळगाव - गुलाबराव देवकर रायगड- सुनील तटकरे ठाणे - आनंद परांजपे परभणी -  राजेश विटेकर कल्याण - बाबाजी पाटील लक्षद्वीप - मोहम्मद फैजल हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत. लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक आहे. त्यामध्ये कॉंग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जातील असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले. पवार साहेबांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून माढासाठी नाव जाहीर केले जाईल असे सांगतानाच एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल असे  जयंत पाटील यांनी सांगितले. एकूण पाचजणांची नावे दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. माढा आणि नगरच्या उमेदवारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. बीडमधून घोषित झालेल्या बजरंग सोनावणे यांच्या नावावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा होती. काल लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली होती.  ही पहिली यादी असून उर्वरित यादी उद्या आणि परवा घोषित करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी काल सांगितले होते. त्यानुसार आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
 मावळची उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ आणि रोहित पवार म्हणतात...
काल पत्रकार परिषदेत मावळ, माढा, अहमदनगर, बीड, गोंदिया येथील उमेदवारांची घोषणा  झालेली नव्हती. काही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याचे चालले आहे, त्यावर चर्चा सुरु असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते.
पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1  अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीने बुलडाणा लोकसभेतून राजेंद्र शिंगणे यांच्या नावाची घोषणा केली आहे. या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून आग्रही आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने सोडली असली तरी स्वाभिमानी अजून 2 जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे यावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तोडगा कसा काढणार याकडे आता लक्ष लागून आहे. पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ ईशान्य मुंबई  - संजय दीना पाटील बारामती - सुप्रिया सुळे बुलडाणा - राजेंद्र शिंगणे सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले कोल्हापूर - धनंजय महाडिक जळगाव - गुलाबराव देवकर रायगड- सुनील तटकरे ठाणे - आनंद परांजपे परभणी -  राजेश विटेकर कल्याण - बाबाजी पाटील लक्षद्वीप - मोहम्मद फैजल हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादीही नुकतीच जाहीर झाली आहे. 21 उमेदवारांच्या या यादीत महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाचीही घोषणा झाली. या दुसऱ्या यादीत उर्वरित सर्व 16 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. यामध्ये नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध पटोले अशी लढत रंगणार आहे. दरम्यान दुसऱ्या यादीतही प्रियांका गांधी यांचं नाव आलेलं नाही. काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या यादीत नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, गडचिरोली-चिमूर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना काल उमेदवारी जाहीर केली. मावळची उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ आणि रोहित पवार म्हणतात... उत्तर प्रदेशातील असून यामध्ये नगिना येथून ओमवती देवी जटाव, मोरादाबाद येथून राज बब्बर, खेरीतून जाफर अली नक्वी, सितापूरमधून कैसर जहाँ, मिसरिख येथून मंजरी राही, मोहनलाल गंज येथून रामशंकर भार्गव, सुल्तानपूर येथून डॉ. संजय सिंह, प्रतापगढ येथून रत्ना सिंह, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल, फतेहपूर येथून राकेश सचन, बहारिचमधून सावित्रीबाई फुले, संत कबीर नगर येथून परवेझ खान, बंसगाव येथून कुश सौरभ, लालगंजमधून पंकज मोहन सोनकर, मिर्झापूर येथून ललितेश त्रिपाठी आणि रॉबर्ट्सगंज येथून भगवती प्रसाद चौधरी या उमेदवारांची नावे काल जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 7 मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली होती.  यात 15 उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या होत्या.  पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. VIDEO : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून लढणार पहिल्या यादीत काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या 15 जागांपैकी 11 जागा उत्तर प्रदेशातील तर चार जागा गुजरातमधील होत्या. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून नशीब आजमावणार आहेत. मावळची उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ आणि रोहित पवार म्हणतात... राहुल गांधी अमेठीतून, सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा झाली असली तरी प्रियांका गांधी यांचं नाव तूर्तास यादीत आलेलं नाही. प्रियांका गांधी यांच्या प्रवेशानंतर सोनिया लोकसभा लढणार की नाही याबद्दल साशंकता होती, मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget