ज्या मतदारसंघात महादेव जानकरांचा पराभव, त्या मतदारसंघात 32 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त!
परभणी लोकसभा मतदारसंघात 34 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यापैकी 32 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डखांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
Parbhani Loksabha Election Result 2024 : लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. मविआच्या लोकसभेच्या 30 जागा निवडूण आल्या आहेत. यातीलच एक महत्वाची जागा म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ (Parbhani Loksabha Election). या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी झाले आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासह वंचितचे उमेदवार हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा पराभव केलाय. या मतदारसंघात 34 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. यामध्ये पंजाबराव डखांसह (Panjabrao Dakh) 31 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे.
विजयाचा दावा करणाऱ्या पंजाबराव डखांचे डिपॉझिट झाले जप्त
परभणी लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. एकूण 34 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, या निवडणुकीत परभणीतील मतदारांनी संजय जाधव आणि महादेव जानकर यांचे डिपॉझिट सुरक्षित ठेवले आहे. यामध्ये वंचितकडून ऐन वेळेला उमेदवारी दाखल करणारे हवामान तज्ञ पंजाब डख यांच्यासह तब्बल 31 उमेदवारांचा डिपॉझिट जप्त झाले आहे. या निवडणुकीत आपण विजयी होऊ असा दावा करणाऱ्या हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांना डिपॉझिट वाचवता येईल एवढं मताधिक्यही घेता आलेलं नाही.
परभणी लोकसभा मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली?
परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये संजय जाधव यांनी मोठ्या मतांनी विजय मिळवला आहे. संजय जाधव यांना 6 लाख 1 हजार 343 एवढं मताधिक्य मिळालं आहे. त्या पाठोपाठ पराभूत झालेले उमेदवार महादेव जानकर यांना 4 लाख 67 हजार 282 एवढे मताधिक्य मिळालं तर तिसऱ्या नंबर वर वंचित चे उमेदवार हवामान तज्ञ पंजाब डख यांना 95 हजार 967 एवढ मतदान मिळाले. मात्र तरीही ते आपलं डिपॉझिट वाचवु शकलेले नाहीत.डखांचा या निवडणुकीत 5 लाख 53 हजार मतांनी पराभव झाला आहे. पंजाब डख यांच्यासह इतर 31 उमेदवारांनाही आपलं डिपॉझिट गमवावे लागले आहे.
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीच्या वाट्याला 17 जागा आल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडूण आला आहे. राज्यात भाजपने 45 प्लसचा नारा दिला होता. मात्र, जनतेनं महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचं दान टाकलं आहे.
महत्वाच्या बातम्या: