एक्स्प्लोर

Palghar Vidhan Sabha : पालघर विधानसभा मतदारसंघ :

Palghar Assembly Constituency Election 2024 : पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा यांच्यात लढत आहे.

Palghar Vidhan Sabha Election 2024 : पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्द शिवसेना ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीने शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी तिकीट दिलं आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी दिली आहे. पालघर हा शिवसेनेचा गड मानला जातो. गेल्या दोन टर्ममध्ये येथील मतदारांनी शिवसेनेला मत दिलं आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांनी दोन वेळा खासदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संवाद आहे. तसेच, शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिवसेनेचा मतदार नेमका कुणाला मतदान करणार, हे पाहावं लागणार आहे. 

मतदारसंघातील समस्या

पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी वर्सोवा ते पालघर, पालघर ते विरार आणि पालघर ते डहाणू असा एक्स्प्रेस रस्ता अर्थात सिलिंक करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या सीलिंकमुळे नागरिकांचा प्रवास कमी वेळेत होईल. त्यासोबतच केंद्र सरकारने वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. मच्छीमारांचा व्यवसाय देखील दुप्पट होईल. 12 लाख तरुणांना रोजगार देण्यात येईल. एमएमआरडीएचा विस्तार देखील पालघरपर्यंत होईल. पालघरला आपण नवीन एअरपोर्ट उभारत आहोत. यामुळे पालघर हा ग्रामीण विभाग न राहता भविष्यात हे देशाचे ग्रोथ इंजिन होईल, हे मुद्दे घेऊन महायुती प्रचारात उतरली आहे. त्यामुळे पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचे हात बळकट करावं, असं आवाहन महायुतीकडून करण्यात येत आहे.
 
पालघर विधानसभा निवडणूक क्षेत्र महाराष्ट्रातील 288 विधानसभा क्षेत्रांपैकी एक आहे. या मतदारसंघात पालघर आणि डहाणू तालुक्याच्या काही भाग येतो.  सौंदर्य आणि सांस्कृतिक विविधतेसाठी पालघर मतदारसंघ ओळखला जातो. पालघर विधानसभा शिवसेनेचा गड मानला जातो. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाच्या निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

पालघरचा राजकीय इतिहास

पालघर क्षेत्राचा राजकीय इतिहास विविध पक्षांच्या प्रभावाखाली होता. 1962 मध्ये काँग्रेसचे श्रीधर पाटील विजयी झाले. त्यानंतर, 1967 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे नवनीत्राई शाह यांनी झेंडा फडकवला. काँग्रेसने 1972 मध्ये विनायक पाटील विजयी झाले. 80 च्या दशकात काँग्रेसने आपली स्थिती पुनः मजबूत केली, पण 1990 नंतर इथे शिवसेनेचा दबदबा वाढू लागला. 1990 मध्ये अविनाश सुतार आणि 1995 मध्ये मनीषा निमकर यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला. मनीषा निमकर यांनी 1999 आणि 2004 मध्येही शिवसेनेची सीट जिंकून आणली. 2009 मध्ये काँग्रेसचे राजेंद्र गावित यांनी निवडणूक जिंकून काँग्रेसनं कमबॅक केलं. 2014 मध्ये शिवसेनेचे कृष्णा घोडा बाजी मारली. 2019 मध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांनी गड जिंकला.

पालघर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढली

  • जयेंद्र दुबळा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
  • राजेंद्र गावित - शिवसेना

पालघर विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल

  • श्रीनिवास वनगा (शिवसेना) - 68,040 मते (विजयी)
  • योगेश नाम (काँग्रेस) - 27735 मते
  • उमेश गोवारी (मनसे) - 12819 मते

पालघर विधानसभा निवडणूक 2014 चा निकाल

  • कृष्णा घोडा (शिवसेना) - 46142 मते (विजयी)
  • राजेंद्र गावित (काँग्रेस) - 45627 मते
महत्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
Embed widget