एक्स्प्लोर
पाचोरा विधानसभा मतदारसंघ | एका पक्षाला दुसऱ्या वेळी नाकारणारा मतदारसंघ
पाचोरा चाळीसगावमध्ये भाजपची मोठी ताकद असून लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपाला मोठे झालेले मतदान पाहता युती झाल्यास भाजप याची परतफेड म्हणून शिवसेनेला मदत करेल त्यामुळे सेनेचे पारडे जड राहील. अन्य पक्षांची उमेदवारी असली तरी निकालावर परिणाम करू शकणार नाही असे चित्र आहे.
समाजवादी , प्रजासमाजवादी आणि काँग्रेस पक्षांचा विचारांचा पगडा असलेल्या पाचोरा मतदारसंघ. निवडणुकीमध्ये सातत्याने एकाच पक्षाला कधीही साथ न देणारा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. 1990 पर्यंत काँग्रेस, जनता दलाला साथ देणाऱ्या या मतदारसंघाने 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला निवडून दिले. या दहा वर्षाच्या काळात पाचोरा भडगाव तालुक्यात शिवसेना उभी राहिली आणि झपाट्याने वाढली.
हे ही वाचा -पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघ : विरोधात आमदार देण्याची परंपरा
2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराला निवडून देऊन मतदारसंघाने पक्ष बदलण्याची परंपरा राखली. 2014 च्या निवडणुकीत मोदींचा देशभर झंझावात असताना मतदारसंघाने भाजप उमेदवाराला झिडकारत शिवसेना उमेदवार किशोर पाटील यांना निवडून देत भाजपाला धक्का दिला.
हे ही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व
आज पाचोरा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे. शिवसेना देखील विस्तारली असल्याने आगामी विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच असेल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांना परत तिकीट दिले जाण्याची शक्यता असून शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर पाटील हेच सेनेचे उमेदवार असतील. जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व नसल्याने राष्ट्रवादीला आपल्या ताकदीवर लढावे लागेल तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपला चांगलीच साथ येथे दिल्याने भाजप सेनेच्या मागे उभा राहील.
हे ही वाचा - चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनवणे यांना विजयासाठी करावा लागणार संघर्ष
अशा ही स्थितीत या मतदारसंघाचा निवडणूक निकालाचा लौकीक पाहता शिवसेनेला परत संधी मिळणार काय याची उत्सुकता आहे. पाचोरा चाळीसगावमध्ये भाजपची मोठी ताकद असून लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपाला मोठे झालेले मतदान पाहता युती झाल्यास भाजप याची परतफेड म्हणून शिवसेनेला मदत करेल त्यामुळे सेनेचे पारडे जड राहील. अन्य पक्षांची उमेदवारी असली तरी निकालावर परिणाम करू शकणार नाही असे चित्र आहे.
हे ही वाचा - भुसावळ विधानसभा मतदारसंघ | भाजपचे वर्चस्व कोण मोडीत काढणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement