एक्स्प्लोर

One Nation One Election Bill: मोठी बातमी! 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; सूत्रांची माहिती

One Nation, One Election Bill: 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिल्याची माहिती समोर आलीय. आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक, संसदेत सादर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Union Cabinet Clears One Nation, One Election Bill: नवी दिल्ली: भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या 'एक देश, एक निवडणूक' (One Nation, One Election) विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने 'वन नेशन, वन इलेक्शन' संदर्भातील अहवाल तयार केला होता. या अहवालात 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाच्या बाजूने शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात 'एक देश, एक निवडणूक' विधेयक संसदेत सादर केले जाईल, अशी चर्चा होती. त्यानुसार आता केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) या विधेयकाला मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडले जाईल. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचे रुप प्राप्त होईल. त्यामुळे आता एनडीए सरकार 'एक देश, एक निवडणूक' विधेयक संसदेत कधी मांडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात हे विधेयक मंजुरीसाठी संसदेच्या पटलावर मांडले जाऊ शकते.

मात्र, इंडिया आघाडीचा 'एक देश, एक निवडणूक' असणारा विरोध पाहता या विधेयकाला इतक्या सहजासहजी मंजुरी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. 'एक देश, एक निवडणूक' हा भाजपच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी विषय आहे. देशात तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर भाजप 'एक देश, एक निवडणूक' हे धोरण पुढे नेईल, याबाबत अंदाज वर्तविले जात होते. हे अंदाज आता खरे ठरण्याची शक्यता आहे.

लोकसभेत 'एक देश, एक निवडणूक'  विधेयकाला विरोध झाल्यास ते संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले जाऊ शकते. मात्र, सत्ताधारी एनडीए आघाडी 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला यंदाच्या अधिवेशनात मंजूर करवून घेऊ शकते का? हे पाहावे लागेल. या विधेयकावरुन संसदेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटकपक्ष काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. 'एक देश, एक निवडणूक' हे विधेयक संसदेत मंजूर झाले तरी त्याची अंमलबजावणी  2029 पासून होईल. 

हिवाळी अधिवेशनातच 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला मंजुरी मिळणार? 

'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिल्याची माहिती समोर आलीय. आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक, संसदेत सादर होणार असल्याची माहिती आहे. 'एक देश, एक निवडणूकी'बाबत रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. 'एक देश एक निवडणुक' विधेयकाबाबत सरकारची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारला एकमताने हे विधेयक मंजूर करून घ्यायचं आहे. त्यामुळे या विधेयकावर चर्चेसाठी ते विधेयक मोदी सरकार, सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समिती किंवा जेपीसीकडे पाठवू शकते.

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी दिले होते संकेत

नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी यांनी आतापर्यंत अनेकदा 'एक देश एक निवडणूक' या धोरणाचा उल्लेख केला आहे. हे धोरण लागू होणे देशासाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे, असे भाजपचे नेते वारंवार सांगताना दिसायचे. यंदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणातही मोदींनी One Nation One Election धोरणाचा उल्लेख केला होता.  एक देश एक निवडणूक या निर्णयासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा. संपूर्ण 5 वर्षे राजकारण चालत राहायला नको. निवडणुका केवळ तीन ते चार महिन्यांत व्हाव्यात. एकाचवेळी निवडणुका होत असल्यानं विकासकामांना खीळ बसणार नाही. निवडणूक आयोजनचा खर्चही कमी होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "अत्यंत चांगला निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली सर्वांनी या निर्णयाला मान्यता दिली. यापूर्वी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्त्वात एक समिती स्थापन झाली होती. याच समितीनं हा अहवाल कॅबिनेटपुढे ठेवला होता. त्यानंतर कॅबिनेटनं याला मान्यता दिली. निश्चितपणे संसदेच्या सभागृहात पुढच्या काही काळात हे विधेयक मांडलं जाईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल."

पाहा व्हिडीओ : One Nation One Election : एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजूरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 630AM 13 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 13 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्ससकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM Superfast

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Embed widget