एक्स्प्लोर

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही : मुख्य निवडणूक कार्यालय

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी 'नेटवर्क जॅमर्स' लावण्याच्या तसेच अन्य मुद्द्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या मागणीच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मुंबई  : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस, वायर, इंटरनेट, वायफाय किंवा अन्य कोणत्याही बाह्य यंत्रणेशी जोडली किंवा त्याद्वारे नियंत्रित केली जाऊ  शकत नाहीत. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जॅमर्स लावण्याची आवश्यकता नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी 'नेटवर्क जॅमर्स' लावण्याच्या तसेच अन्य मुद्द्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या मागणीच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात पुढे माहिती देण्यात आली आहे की, मतमोजणी फेरीनिहाय केली जाते. त्या फेरीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच पुढील फेरीच्या मतमोजणीच्या ईव्हीएम मतमोजणी केंद्रात आणल्या जातात. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची ईव्हीएममधील मतांशी पडताळणीसाठी निवडावयाची मतदान केंद्रे चिठ्ठी टाकून निवडली जातात. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. यासाठीच्या मतदान केंद्रांची निवड ही उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत केली जाते. फेरमतमोजणी बाबतची तरतूद 'निवडणूक संचालन नियम, 1961' च्या 'नियम 56-डी' नुसार निर्धारित केलेली आहे. त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे कार्यवाही केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने चंद्रबाबू नायडू आणि अन्य विरुद्ध भारत सरकार आणि अन्य या रिट याचिका क्र. 273/2019 मध्ये  8 एप्रिल 2019 च्या निकालातील निर्देशानुसार प्रत्येक मतदारसंघात 5 व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी केली जाते, असेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Embed widget