संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अजित पवारांना मानाचं पान, थेट अमित शाहांच्या उजव्या हाताला स्थान!
NDA च्या बैठकीत अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे हेही मंचावर नितीश कुमार यांच्या शेजारी बसलेले दिसले.
NDA Parliamentary Party Meeting : भाजपच्या नेतृत्वातील एनडीएची (NDA Meeting) नवी दिल्लीतील सेंट्रल हॉलमध्ये महत्वाची बैठक आहे. एनडीएमधील पक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. तसंच एनडीए खासदारांचीही आजच बैठक आहे. पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडतील. त्याशिवाय नरेंद्र मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व खासदारही दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या बैठकीला उपस्थित आहेत. महत्वाचं म्हणजे, या बैठकीवेळी अजित पवार हे अमित शाह यांच्यासोबत मंचावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे हेही मंचावर नितीश कुमार यांच्या शेजारी बसलेले दिसले.
देवेंद्र फडणवीस हे एनडीएच्या नेत्यांसोबत स्ट्रेंटल हॉलमध्ये बसले होते. राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे अजित पवार यांना मंचावर बसण्याचा मान मिळाला. एकनाथ शिंदेही शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनाही मानाचे स्थान मिळाले. अजित पवार अमित शाह यांच्या शेजारी मंचावर बसले होते.
#WATCH | Leaders of the NDA at Samvidhan Sadan (Old Parliament) ahead of the meeting of the NDA MPs.
— ANI (@ANI) June 7, 2024
(Source: Sansad TV) pic.twitter.com/rX9n3WQgPt
5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू - अजित पवार
एनडीएचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल. आमच्याकडे जवळपास 300 जागा आहेत, त्यामुळे 100% आम्ही आमचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू. सर्व काही ठीक होईल, असा विश्वास बैठकीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी व्यक्त केला.
#WATCH | Delhi: Maharashtra Deputy CM Ajit Pawar says "The govt (NDA) will complete its 5-year term. We have around 300 seats so 100% we will complete our term of 5 years. Everything is going to be fine..." pic.twitter.com/ne78utEdfY
— ANI (@ANI) June 7, 2024
एनडीएचे सर्व खासदार, सर्व मुख्यमंत्री, यांच्यासह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. जिथे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडला. त्यास मित्रपक्ष आणि भाजप खासदारांनी अनुमोदन दिले. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले, त्यामध्ये भाजप प्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. एनडीएच्या पदरी 293 जागा मिळाल्या. 2014, 2019 प्रमाणे 2024 मध्ये भाजपला एकट्याला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, टीडीपीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू आणि जनता दल (युनायटेड) प्रमुख नितीश कुमार यांनी अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यादरम्यान राष्ट्रपतींना पाठिंबा देणाऱ्या खासदारांची यादी देण्यात येणार आहे. एनडीएकडे 293 खासदार आहेत, जे 543 सदस्यांच्या लोकसभेतील बहुमताच्या 272 पेक्षा जास्त आहे. यावेळी भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयू या दोन मित्रपक्षाची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे. एनडीएमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पक्ष टीडीपी आणि जेडीयू आहेत. टीडीपीकडे 16 तर जेडीयूकडे 12 खासदार आहेत.
रविवारी शपथविधी -
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सर्व खासदार सेंट्रल हॉलमधील या बैठकीला उपस्थित आहेत, जे नरेंद्र मोदी यांची संसदेचे नेते म्हणून औपचारिकपणे निवड करतील. रविवारी, 9 जून रोजी शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी सायंकाळी सहा वाजता शपथ घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे नेते प्रल्हाद जोशी (senior BJP leader Pralhad Joshi) यांनी दिली.
मोदींचं जल्लोषात स्वागत -
पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या बैठकीसाठी सेंट्रल हॉलमध्ये पोहोचले. जेपी नड्डाही त्यांच्यासोबत उपस्थित होते. टाळ्यांच्या कडकडाटात पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. यावेळी ‘वेलकम भाई, स्वागत’ अशा घोषणा देत स्वागत करण्यात आले. सर्व खासदारांनी उभे राहून मोदींचे स्वागत केले.