एक्स्प्लोर
वैभव पिचड आणि मुख्यमंत्र्यांची भेट, राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला?
वैभव पिचड हे अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच, आता पक्षाचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि आमदार वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपासून आमदार वैभव पिचड यांच्या बंडखोरीची चर्चा रंगली होती. त्यातच त्यांनी बुधवारी (24 जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली. या भेटीच्या वेळी नुकतेच भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैभव पिचडही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
वैभव पिचड हे अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर मधुकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. माझी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे अन्य कोणत्या पक्षात जाण्याचा विचार या जन्मात तरी माझ्या डोक्यात येणार नाही, असं वक्तव्य मधुकर पिचड यांनी काही महिन्यांपूर्वीच केलं होतं. परंतु आता त्यांचाच मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे.
दरम्यान, मधुकर पिचड हे राज्यात अनेक वर्ष मंत्री होते. राज्याच्या आदिवासी मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मुधकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement