एक्स्प्लोर
Advertisement
विखेंकडून सुपुत्राचा उघड प्रचार, कारवाई करणार की नाही? राष्ट्रवादीचा काँग्रेसला सवाल
राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांसमोर उघडपणे युतीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत, असा दावा राष्ट्रवादीने अशोक चव्हाणांना पत्र लिहून केला आहे
मुंबई : राष्ट्रवादीतर्फे अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक अंकुश काकडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र लिहून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची तक्रार केली आहे. विखे हे नगरमधील युतीचे उमेदवार सुजय विखेंचा प्रचार करत असल्याची तक्रार काकडेंनी पत्रात केली आहे.
संग्राम जगताप हे आघाडीचे उमेदवार आहेत. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असूनही राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्याविरोधात उभे असलेले शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आणि सुपुत्र सुजय विखेंचा प्रचार करत आहेत, हे गंभीर आहे. यावर कारवाई करणार की नाही? असा सवाल राष्ट्रवादीतर्फे काँग्रेसला विचारला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांसमोर उघडपणे युतीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे आघाडीकडून नगर जिल्ह्याचा समन्वयक म्हणून मी विखेंवर कारवाईची मागणी करतो, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये होणाऱ्या सभेत विखे प्रवेश करण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते भाजपच्या गोटात सामील होण्याची चिन्हं आहेत.
VIDEO | मुलापाठोपाठ विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर? | स्पेशल रिपोर्ट
काँग्रेसमधील काही नाराज आमदारांना घेऊन विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खरं तर, विखे पाटील यांचा प्रवेश लवकर व्हावा, म्हणून भाजपकडून दबाव आहे. पण काँग्रेसमधील नाराज आमदार 23 मेपर्यंत थांबवण्याची भूमिका घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेण्याचं सूतोवाच करत राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते. त्यामुळे सुपुत्र सुजय विखेंपाठोपाठ वडीलही भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता आहे.
सुजयचा भाजपात जाण्याचा निर्णय योग्यच होता, त्याला भाजपने सन्मानाने बोलावलं. मुलगा पुढं जातोय याचं समाधान आहे, अशा भावनाही विखे पाटलांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केल्या होत्या.
सुजय विखेंचा भाजपप्रवेशाचा निर्णय योग्यच, वडील राधाकृष्ण विखे पाटलांचं मत
सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. आता ते अहमदनगरमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
विश्व
Advertisement