एक्स्प्लोर
Advertisement
बांदिवडेकर यांच्याबाबतचं वादळ शमलं, उमेदवारी कायम : अशोक चव्हाण
"बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी केलेली असून त्यांची उमेदवारी कायम आहे", अशी माहिती चव्हाण यांनी 'एबीपी माझा' सोबत बोलताना दिली आहे.
मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. बांदिवडेकरांचा 'सनातन संस्थे'शी संबंध असल्याचा आरोप झाल्याने त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षातून करण्यात येत होती. मात्र ही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. "आम्ही बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी केलेली असून त्यांचा देखील खुलासा प्राप्त झाला आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेलं वादळ शमलेलं आहे. त्यांची उमेदवारी कायम आहे", अशी माहिती चव्हाण यांनी 'एबीपी माझा' सोबत बोलताना दिली आहे.
बांदिवडेकर यांच्यावर वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारा येथील स्थानिक नागरिकांनी काढलेल्या रॅलीत सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर सनातन ही जातीयवाद संस्था आहे, मात्र मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने कोणत्याही एका जातीसाठी करत नाही. माझा सनातन संस्थेशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण बांदिवडेकर यांनी दिलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement