महाविकास आघाडीचं ठरलं? भिवंडी लोकसभेतील तिन्ही विधानसभा मतदार संघ शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार, खासदारांचा थेट दावा
Bhiwandi Vidhan Sabha Election 2024: भिवंडी पश्चिम, शहापूर (Shahapur) आणि मुरबाड (Murbad) या तीन विधानसभांवर आम्ही दावा करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
Bhiwandi Vidhan Sabha Election 2024: येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Elections) होऊ घातल्या आहेत. अद्याप विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरीदेखील सर्व पक्षांची विधानसभेसाठी लगबग सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी विधानसभा निहाय मतदारसंघांमध्ये राजकीय कार्यक्रमांचं आयोजन सुरू केलंय. भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये (Bhiwandi Lok Sabha Constituency) येणाऱ्या भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, शहापूर, मुरबाड आणि कल्याण पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं (Nationalist Congress Party - Sharad Pawar) तीन विधानसभा मतदारसंघांवर (Legislative Constituency) दावा केला आहे.
भिवंडी पश्चिम, शहापूर (Shahapur) आणि मुरबाड (Murbad) या तीन विधानसभांवर आम्ही दावा करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
महायुतीचं वर्चस्व असल्यानंच आम्ही तिनही मतदार संघावर दावा केलाय : खासदार सुरेश म्हात्रे
खासदार सुरेश म्हात्रे यांनी दावा केलेले तीनही विधानसभा मतदारसंघ सध्या महायुतीकडे (Mahayuti) असून या तिन्ही मतदार संघामध्ये भाजप (BJP) आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) वर्चस्व आहे. भिवंडी पश्चिम मतदार संघात (Bhiwandi West Assembly Constituency) भाजपचे आमदार महेश चौघुले, मुरबाडमध्ये भाजपचे आमदार किसन कथोरे तर शहापूरमध्ये अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचे आणि महायुतीचं वर्चस्व असल्यानंच या तीनही मतदार संघावर आम्ही दावा केला असल्याचं स्पष्टीकरण खासदार सुरेळ म्हात्रे यांनी दिलं आहे.
भिवंडी पश्चिम मतदार संघावर आम्ही सर्व ताकदीनिशी दावा करणार असून विधानसभेच्या 2004, 2009, 2014, 2019 या सर्व विधानसभेचा मागील वीस वर्षांचा इतिहास आणि निवडणुकांचा निकाल पाहिल्यास या वीस वर्षांत भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला नाकारलं आहे. मुस्लिम मतदार कधीही काँग्रेसच्या बाजूनं नव्हता, मुस्लिम मतदार हा नेहमी आघाडी सरकारच्या बाजूनं आणि आता महाविकास आघाडीच्या बाजूनं राहिला आहे. त्यातच मागील दहा वर्षांत लोकसभा निवडणुकी बरोबरच विधानसभा निवडणुकीत देखील येथून काँग्रेसला अपयश आल्यानं भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघावर आमचा प्रबळ दावा, असल्याचं मत खासदार म्हात्रे यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे.
विलास पाटलांना नेमकं काय साध्य करायचंय? : खासदार सुरेश म्हात्रे
माजी महापौर विलास पाटील हे काँग्रेसमधून भिवंडी पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्यानं त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी म्हात्रे यांना विचारलं असता भिवंडी शहरातून काँग्रेस संपवण्याचं काम विलास पाटील यांनीच केलं आहे. काँग्रेसनं त्याच विलास पाटलांना पक्षात प्रवेश दिला आहे. भिवंडी महापालिकेवर एकहाती काँग्रेसची सत्ता असताना विलास पाटलांनी काँग्रेसचे 18 नगरसेवक फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. 2014, 2019 आणि 2024 च्या लोकसभा आणि झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील विलास पाटील यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन काँग्रेसला नेमकं काय साध्य करायचं आहे? हे मला कळालं नाही अशी प्रतिक्रिया देखील खासदार सुरेश म्हात्रे यांनी विलास पाटील यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशावर दिली आहे.