एक्स्प्लोर

नाशिक पश्चिम मतदारसंघ | जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस, राष्ट्रवादी आणि मनसेचंही मोठं आव्हान

कामगार कष्टकरी जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक तर असंख्य आहेत. त्यातील मोजक्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळणार असून मतदारराजा कोणाला संधी देतो याकडे लक्ष लागलं आहे.

नाशिक : राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाली आणि त्यामध्ये नाशिक पश्चिम या विधानससभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्याआधी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष उभारला. शिवसेनेत असल्यापासूनच राज ठाकरे यांची नाशिकवर मजबूत पकड होती. 2009 च्या निवडणुकीत राज ठाकरेंचा करिष्मा चालला. नाशिक शहरातील तिन्ही जागा मनसेने पटकावल्या त्यातलाच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ. पहिल्या फटक्यात मनसेचे नितीन भोसले आमदार झाले. पाच वर्षांच्या कालावधीत मनसेला मिळालेला जनाधार टिकविता आला नाही. पक्षाची पडझड झाली आमदारांना आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवता आला नाही. जेवढ्या जोराने मनसेची लाट आली होती तेवढ्याच जोमाने लाट ओसरली. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप नगरसेविका सीमा हिरे मनपाच्या सभागृहातून थेट विधिमंडळात जाऊन धडकल्या. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशा बहुरंगी निवडणुकीत सीमा हिरे यांनी 30 हजार मतांनी विजयश्री खेचून आणत प्रस्थापितांना पराभवाची धूळ चारली. मात्र आता सीमा हिरे यांना पक्षांतर्गत विरोध वाढू लागला आहे. भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही या मतदारसंघावर आपला हक्क सांगायला सुरवात केली आहे. युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेद्वारे वातावरण निर्मिती केली आहे. शिवसेना-भाजप यांच्या जागावाटपात हा मतदारसंघ कळीचा ठरणार असून युती झाल्यास ही जागा भाजपच्या वाट्याला येते की शिवसेनेच्या याबबत प्रचंड उतुस्क्ता आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सातपूर आणि अंबड या दोन औद्योगिक वसाहतींचा भाग मोडतो. कामगार वर्गाची वस्ती या भागाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्यातील (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) या तालुक्यातील लाखो लोक सातपूर अंबड परिसरात स्थायिक झाले आहेत. गेल्या काही वर्षापासून कसमादे मतावर मतदार संघाचे राजकीय समीकरण बदलत आहे. सुरवातीपासूनच हा भाग शिवसेना भाजप युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या येथे शिवसेना भाजपचे 42 पैकी 38 नगरसेवक आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक १ लाख ४ हजार मतं मिळाल्याने इच्छुकांचे हौसले अजूनच बुलंद झाले आहेत. भाजपकडून विद्यमान आमदार सीमा हिरे, माजी सभागृह नेता दिनकर पाटील, निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, माजी सरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांचे नातेवाईक डॉ. प्रशांत पाटील इच्छुक आहेत. तर शिवसेनेकडून अर्धा डझनहून अधिक इच्छुक मातोश्रीचे उंबरे झिजवत आहेत. माजी विरोधीपक्ष नेते सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, माजी सभागृह नेता दिलीप दातीर यांचा त्यामध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमधून स्वगृही परतलेले माजी आमदार अपूर्व हिरे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार राहतील की जुने नेते नाना महाले यांना संधी मिळणार? हा प्रश्न आहे. कॉंग्रेसला उमेदवार शोधावा लागणार आहे. तर मनसेकडून माजी गटनेते सलीम शेख किवा शहराध्यक्ष अनिल मटाले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करावी लागणार आहे. माकपकडून कामगार नेते डॉ. डी. एल. कराड हे पुन्हा नशीब अजमावणार का? याकडेही कामगार विश्वाच लक्ष लागलं आहे. एकूणच कामगार कष्टकरी जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक तर असंख्य आहेत. त्यातील मोजक्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळणार असून मतदारराजा कोणाला संधी देतो याकडे लक्ष लागलं आहे. 2014 विधानसभा मतदान सीमा हिरे - भाजप - 67489 सुधाकर बडगुजर - शिवसेना - 37819 शिवाजी चुंभळे - राष्ट्रवादी काँग्रेस - 30236 दशरथ पाटील - काँग्रेस- 21981 डी. एल. कराड - भाकप - 16970 नितीन भोसले - मनसे- 8712 2019 लोकसभा मतदारसंघ हेमंत गोडसे - शिवसेना- 144144 समीर भुजबळ - राष्ट्रवादी - 40850 माणिकराव कोकाटे - अपक्ष - 6719 पवन पवार - वंचित आघाडी - 20784
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget