एक्स्प्लोर

Nitin Gadkari : खासदारकी पाठोपाठ नितीन गडकरींच्या केंद्रीय मंत्रिपदाचीही हॅट्रिक; गडकरींच्या वाट्याला कुठले मंत्रीपद?  

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. अशातच भाजपचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा खासदारकी पाठोपाठ केंद्रीय मंत्रिपदाचीही हॅट्रिक केलीय.

नवी दिल्ली : आपल्या विशेष आणि उल्लेखनीय विकास कामांमुळे देशभरात स्व:ताची वेगळी ओळख निर्माण करणारे नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केलाय. यानंतर आता नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्रिपदाचीही हॅट्रिक करणार आहेत. भाजपप्रणित एनडीए आघाडीचं सरकार लवकरच स्थापन होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून मोदींसह देशातील 46 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात महाराष्ट्रातील 6 नावांवर शिक्कामोर्तब झालाय. यात नितीन गडकरी यांचा देखील समावेश आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघ विदर्भातील प्रमुख मतदारसंघापैकी महत्वाचा मतदारसंघ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी असे दोन प्रमुख वैचारिक केंद्र असलेला हा मतदारसंघ परंपरागतरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. मात्र 2014 नंतर देशात झालेले राजकीय परिवर्तन व नागपूरला गडकरींसारखा दिग्गज नेता मिळाल्यानंतर नागपूरकर मतदारांनी भाजपला (BJP) भक्कम साथ दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले (Nana Patole) यांचा तब्बल 2,16,009 मतांनी पराभव केला होता.

त्यानंतर 2014 च्या तुलनेत गेल्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य काहीसे घटले होते. मात्र त्यांनी त्यावेळी देखील विजय संपादन केला होता. त्यावेळी 26 मे 2014 ला त्यांनी प्रथम केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला होता. तर 2019 ते आता 2024 या काळातही त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचाच कार्यभार होता. त्यानंतर आज नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्रिपदाचीही हॅट्रिक करणार आहेत. आज त्यांनी आपल्या मंत्रीपदाची शपत घेतली असून त्यांना आता कुठले मंत्री पद मिळणार याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

खासदार नितीन गडकरींच्या केंद्रीय मंत्रिपदाचीही हॅट्रिक

मै नितीन जयराम गडकरी ईश्वर की शपथ लेता हो की, मै विधि द्वारा स्थापित भारत के संविधान प्रति  सच्ची श्रद्धा और निष्ठा रखुंगा. भारत की प्रभुता और अखंडता  अक्षुन्य रखुंगा. संग के मंत्री  के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वाहन करूँगा तथा मे भय या पक्षपा अनुराग या द्वेष केबिला सभी प्रकार के लोगो के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा. मै ईश्वरकी शपथ लेता हू की जो विषय संघ के मंत्री के रुप मे मेरे विचार के लिए लाया जायेगा अथवा मुझे ज्ञात होगा असे किती व्यक्ती और व्यक्तींको, तपके शिवाय जब ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्य पे सम्यक निर्माण के लिए ऐसा करना अपेक्षित हो मै प्रत्यक्ष प्रत्यक्ष रूप से सासुचित या प्रगट नाही करूँगा.  अशा शब्दात नितीन गडकरी यांनी शपत घेतलीय. 

नितीन गडकरींचा राजकीय प्रवास   

पूर्ण नाव : नितीन गडकरी

जन्मतारीख : 27 मे 1957

जन्मस्थान : नागपूर, महाराष्ट्र, भारत

शिक्षण: वाणिज्य शाखेत बॅचलर पदवी

नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकी, वाणिज्य आणि कायद्यातील पदवी

राजकीय पक्ष :भारतीय जनता पक्ष (भाजप)

राजकीय भूमिका 

नितीन गडकरी हे 1989 पासून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. 1999-2005 पर्यंत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेही होते. 
2009 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेतृत्व केले.

महाराष्ट्रात 1995-1999 या काळात भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान 55 हून अधिक उड्डाणपूल त्यांनी बांधले. 

2009 साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातही त्यांनी विविध कामे केली आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 26 मे 2014 ला त्यांनी प्रथम केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. तेव्हा त्यांनी भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता. त्यांनंतर 2019 ते 2024 या काळातही त्यांच्याकडं भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचाच कार्यभार होता.

गडकरींनी नागपुरात केले बेरजेचे राजकारण

नितीन गडकरी यांनी गेल्या 10 वर्षात नागपुरात काही रचनात्मक काम केले आहे. राजकारणापलिकडे जाऊन सेवा उपक्रम, सांस्कृतिक व क्रिडा महोत्सव, ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगांसाठी विविध योजना राबवून सर्वसमावेशकता साधण्याचे प्रयत्न केले आहे. याशिवाय गडकरींनी नागपुरात बेरजेचे राजकारण करण्याचे प्रयत्न केले आहे. पक्ष आणि विचारधारेच्या पलिकडे गडकरींचे सर्व विचारधारेच्या लोकांमध्ये व समाजातील सर्व आयामांमध्ये काम करणारे मित्र आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jammu-kashmir Vidhansabha Rada :  ठरावाची प्रत फाडली, जम्मू-काश्मीर   विधानसभेत  कलम 370वरून राडाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 07 November 2024Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Embed widget