एक्स्प्लोर

Narendra Modi : नांदेडवरुन जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे पूर्ण मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळेल, नांदेडच्या सभेत नरेंद्र मोदींचा विश्वास

Narendra Modi, Nanded : नांदेडवरुन जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर पोहोचणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

Narendra Modi, Nanded : "नांदेडवरुन जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे पूर्ण मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळेल. नांदेड ते दिल्ली आणि आदमपूरसाठी विमानसेवा सुरु झाली आहे. लवकरच आपल्या शीख बांधवांना नांदेडमधून अमृतसरपर्यंतचा विमान प्रवास करण्याची संधी देखील मिळणार आहे", असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केलाय. ते नांदेड (Nanded) येथील सभेत बोलत होते. 

नरेंद्र मोदी म्हणाले, मी मराठवाड्याच्या भूमीवरुन स्वामी रामानंद तीर्थ आणि येथील स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धापूर्वक नमस्कार करतो. आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीच्या समर्थनार्थ एक लाट सुरु आहे. प्रत्येकाच्या तोंडी आज एकही नारा आहे की, भाजप-महायुती आहे, तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे. आज देश विकसित भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुढे जात आहे. देशातील लोकांना माहिती आहे की, विकसित देश बनण्यासाठी भाजप आणि मित्रपक्ष गांभिर्याने काम करत आहेत. त्यामुळे एनडीए आणि भाजप सरकारला लोक सातत्याने निवडून देत आहेत. केंद्रात देशाने लागोपाठ दिसऱ्यांदा एनडीएला सेवा करण्याची संधी दिली आहे. मात्र, यावेळी त्यामध्ये नांदेडचे फुल नव्हते. यावेळी नांदेडचं फुल दिल्लीला पोहोचेल का? असा सवालही पीएम मोदींनी केला. 

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, आज मी डबल ड्युटी करत आहे. एकतर मी मोदीसाठीही मदत मागत आहे आणि याशिवाय मी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील आशीर्वाद मागत आहे. नांदेड लोकसभा क्षेत्रातील लोकांना दोन वेळेस मतदान करायचे आहे. हरियाणाच्या निवडणुकीत भाजपला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. आता हाच इतिहास महाराष्ट्रातील जनता देखील रचणार आहे. मागील दोन दिवसांपासून मी जेथे जेथे गेलो, तेथे लोकांमध्ये मला जाणवलं की, लोकसभेला राहिलेली कसर विधानसभेला भरुन काढली जाईल. तुम्ही वेगवेगळ्या जातींमध्ये वाटले जाल, तर तुमची संख्या कमी होईल. मग काँग्रेसवाले तुमचं आरक्षण तुमच्यापासून हिरावून घेतील.

लोक म्हणतात विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीचे सरकार पाहिजे. महायुतीचीच सरकार पाहिजे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या पापाला अनेक वर्ष सहन करावे लागले आहे. काँग्रेस सरकारने येथील शेतकऱ्यांच्या सुख-दु:खाची पर्वा केली नाही. दुष्काळापासून तुम्हाला दूर करण्यासाठी अनेक पाऊलं उचलले आहेत, असंही मोदी यांनी सांगितलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra CM : ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही माझ्या पक्षाची भूमिका; शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा पत्ता खोलला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prithviraj Patil On  Sudhir Gadgiil : जयश्रीताई तुमसे बैर नही, सुधीर गाडगीळ तुम्हारी खैर नही, पृथ्वीराज पाटील यांचा एल्गारABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 November 2024Sunil Tingare on Sharad Pawar Notice  : शरद पवारांना कोणतीही नोटीस दिली नव्हती - टिंगरेPM Narendra Modi Akola : अकोल्यात नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर काँग्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Vaibhav Naik : नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
Pyre: उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
Embed widget