एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Narendra Modi Oath Ceremony : टीम मोदीमध्ये कोण कोण, NDA च्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे? आतापर्यंत 46 खासदारांची नावे निश्चित

Narendra Modi Oath Taking Ceremony : आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी पीएमओ कार्यलयातून फोनाफोनी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन आला आहे.

Narendra Modi Oath Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. नियमांनुसार मंत्रिमंडळात 78 मंत्री असतात. आज 40 ते 45 मंत्रि शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी पीएमओ कार्यलयातून फोनाफोनी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन आला आहे. त्याशिवाय टीडीपी, एलजेपी (आर) आणि जेडीयू या पक्षातील खासदारांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोणते खासदार असतील, हे पाहूयात.. आतापर्यंत 32 जणांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव यांनाही फोन आला आहे. नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांचीही वर्णी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचे समोर आलेय. 

नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांसोबत मंत्रिपरिषदेत संधी देण्याबद्दल बोलले आहे. त्यानंतरच नावे फायनल झाली असून आता कॉल्स येऊ लागले आहेत. या खासदारांनाही आजच शपथ घेता देण्यात येणार आहे.

आतापर्यंत कुणाकुणाला मंत्रीपदाच्या शपथेसाठी फोन आलेत  

१. जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
२. जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
३. अनुप्रिया पटेल, अपना दल
४. डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
५. के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
६. नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
७. राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
८. अमित शाह, भारतीय जनता पार्टी
९. अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
१०. राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
११. एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
१२. सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
१३. चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
१४. मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
१५. पवन कल्याण, जनसेवा पार्टी (होल्ड)
१६. पियुष गोयल, भारतीय जनता पार्टी
१७. ज्योतिरादित्य शिंदे, भारतीय जनता पार्टी
१८. प्रतापराव जाधव, शिवसेना
१९. कमलजीत सेहरावत, भारतीय जनता पार्टी
२०. रक्षा खडसे, भारतीय जनता पार्टी
२१. रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
२२. के. अन्नामलाई, भारतीय जनता पार्टी (होल्ड)
२३. मनोहरलाल खट्टर, भाजप
२४. राव इंद्रजीत सिंह, भारतीय जनता पार्टी
२५. सुरेश गोपी, भारतीय जनता पार्टी
२६. ज्युएल ओरम, भारतीय जनता पार्टी
२८. मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टी
२९. किशन रेड्डी, भारतीय जनता पार्टी
३०. बंदी संजय कुमार, भारतीय जनता पार्टी
३१. गिरिराज सिंह,भारतीय जनता पार्टी
३१. रवनीत बिट्टू,भारतीय जनता पार्टी
३२. निर्मला सीतारमन,भारतीय जनता पार्टी
३३. अन्नपूर्णा देवी,भारतीय जनता पार्टी
३४. सीआर पाटिल, भारतीय जनता पार्टी
३५. अजय टम्टा, भारतीय जनता पार्टी
३६. एस. जयशंकर, भारतीय जनता पार्टी
३७. जे. पी. नड्डा, भारतीय जनता पार्टी
३८. शिवराज सिंह चौहान, भारतीय जनता पार्टी
३९. पंकज चौधरी, भारतीय जनता पार्टी
४०. कमलेश पासवान, भारतीय जनता पार्टी 
४१. सुधीर गुप्ता, भारतीय जनता पार्टी 
४३. हरदीप सिंग पुरी, भारतीय जनता पार्टी 
४४. सरबानंद सोनोवाल, भारतीय जनता पार्टी  
४५. भुपेंद्र यादव,भारतीय जनता पार्टी 
४६. प्रल्हाद जोशी, भारतीय जनता पार्टी

भाजपकडे कोण कोणती मंत्रालय राहणार ?

पीटीआयच्या वृत्तानुसार, गृह, अर्थ, संरक्षण आणि विदेश मंत्रालयासारखी महत्वाची खाती भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शिक्षण आणि संस्कृतिक मंत्रालयाची कमानही भाजप खासदारांकडे जाऊ शकते. मित्रपक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पदे मिळू शकतात, असे मानले जात आहे. शिवराज सिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहर लाल खट्टर यांसारखे लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले माजी मुख्यमंत्रीही नव्या सरकारमध्ये सामील होऊ शकतात.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजीAmit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Embed widget