एक्स्प्लोर

आपलं हिंदूचं पॅनल बनवू, मुस्लिम उमेदवार आपल्याला नको, अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

नांदेडमध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

नांदेड : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या  (Mahanagarpalika Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आजपासून खरी निवडणुकीला सुरुवात झाली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, नांदेडमध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या समर्थकांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहुयात

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलंय

भारतीय जनता पक्षाने नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट वाटप करताना निष्ठावंतांना डावलून अलीकडेच काँग्रेस व इतर पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्यांना 50-50 लाख रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप होत आहे. अशातच नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 14 अर्थात इतवारा मदीनानगर प्रभागात निवडणूक पॅनल तयार करताना माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्या सहाय्याने खासदार अशोक चव्हाण यांनी इच्छुक उमेदवाराशी थेट मोबाईल फोनवरून संपर्क साधला. खरंतर हा प्रभाग मुस्लिमबहुल प्रभाग आहे. त्यामुळे पॅनल मध्ये एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट देण्याचा प्रस्ताव इच्छुक उमेदवाराने अशोक चव्हाण व डी.पी. सावंत यांच्यासमोर ठेवला. परंतू, आपल्याला मुस्लिम उमेदवार नको, आपलं हिंदूंचं एक पॅनल तयार करु, तुम्ही इतर प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांची नावे सांगा, असे डी पी सावंत यांनी सांगितले. या डी पी सावंत यांच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. अपेक्षित उमेदवार सुचवता येतील पण खर्च करण्याची कुवत माझ्या सकट कुणातही नाही. हे सावंत यांनी खर्चाची संपूर्ण बाजू पक्ष सांभाळेल तुम्ही फक्त नावे द्या असे सांगितले. अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशा वेगवेगळ्या प्रवर्गातून पॅनल तयार करायचे होते. परंतु भाजपला या प्रभागात उमेदवारच मिळाले नाहीत.

महानगरपालिकेच्या निवडुकीला सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तर काही जणांनी बंडखोरी देखील केली आहे. दरम्यान, काही ठिकाणी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे देखील नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अर्ज मागे घे, विधानसभा अध्यक्षांचाच दबाव, धमक्या; खासदार अरविंद सावंतांनी सांगितला भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न'

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget