एक्स्प्लोर

Mumbra-Kalwa Assembly Constituency Election 2024 : मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ : मतदार पुन्हा जितेंद्र आव्हाड यांना कौल देणार की नजीब मुल्ला बाजी मारणार?

Kalwa-Mumbra Assembly Election 2024 : कळवा-मुंब्रा मतदारसंघात शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांना अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांचं आव्हान आहे.

Mumbra-Kalwa Assembly Election 2024 : मुंब्रा-कळवा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघात शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने येणार आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर जितेंद्र आव्हाड यांनी एकहाती सत्ता कायम राखली असताना यंदाच्या निवडणुकीत त्यांना हा गड कायम राखण्याचं आव्हान आहे. कळवा भागात आगरी, कोळी आणि कोकणी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. तर, मु्ंब्रा आणि कौसा भागात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. 2009 सालापासून हा मतदारसंघ जितेंद्र आव्हाडांनी काबीज केलेला आहे. 

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ ठाणे जिल्ह्याच्या नजीकचा असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये येतो, पण ठाणे लोकसभा मतदारसंघात येत नाही. या मतदारसंघात प्रामुख्याने कोळी आणि मुस्लिम बांधव आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड मानला जातो. 2009 पासून इथे जितेंद्र आव्हाड जिंकून येतात.

मतदारसंघाचा इतिहास

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये बनवण्यात आला. याआधी तो बेलापूर मतदारसंघाचा भाग होता. बेलापूर एकेकाळी मोठा मतदारसंघ होता. पण, 2009 मध्ये त्याची पुर्नरचना करण्यात आली आणि कळवा-मु्ंब्रा मतदारसंघ बनला. कळवा-मुंब्रा मतदारसंघात आगरी-कोळी आणि मुस्लिम बांधव हे दोन मोठे मतदारवर्ग आहेत. त्यामुळे या दोन समाजाचा पाठिंबा असणाऱ्या उमेदवाराच्या बाजूने निकाल लागतो. 2009 पासून हा निकाल जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने लागत आहे.

मुंब्रा-कळवा मतदारसंघ कसा आहे?

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड आहे. 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांना मतदारराजाने कौल दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मतदारसंघात खूप कामही केलं आहे. कळव्यात नव्या सुविधा आणि उपक्रमही त्यांनी राबवले आहे. याच कारणामुळे 2014 च्या मोदी लाटेतही जनतेने जितेंद्र आव्हाडांनाच जिंकून दिलं. पण, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदाही मतदारराजा जितेंद्र आव्हाडांना साथ देणार की, नजीब मुल्ला यांना विजयी करणार याकडे आता लक्ष लागलं आहे. 

मतदारसंघातील समस्या

कळवा-मुंब्रा मतदारसंघात वाहतूक कोंडी हा मोठा विषय आहे. हा विषय अलिकडच्या काळात वेगवेगळ्या ओव्हरब्रीजमुळे कामी लागला आहे. कळवा खाडीच्या बाजूने नवीन पूल उभारल्याने वाहतूक कोंडींची समस्या कमी झाली आहे. त्याशिवाय कळवा-खारेगाव रेल्वे फाटक बंद करत तिथे ओव्हर ब्रीज बांधण्यात आल्याने रेल्वे फाटकात होणारे अपघात थांबले आहेत. पण, इथे अनधिकृत बांधकामाची मोठी समस्या असून यासोबत गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा - प्रमुख लढती

जितेंद्र आव्हाड - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष

नजीब मुल्ला - राष्ट्रवादी काँग्रेस

2019 चा निकाल

  • जितेंद्र आव्हाड - राष्ट्रवादी काँग्रेस (109283 मते)
  • दीपाली सय्यद - शिवसेना (75639 मते)

2014 चा निकाल

  • जितेंद्र आव्हाड - राष्ट्रवादी काँग्रेस (86533 मते)
  • दशरथ पाटील - शिवसेना (47683 मते)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kopri-Pachpakhadi Assembly Election 2024 : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ : एकनाथ शिंदे बाजी मारणार की मतदार भाकरी फिरवणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget