एक्स्प्लोर

मुंबई महापालिकेने अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा

Andheri East By poll 2022 : ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय.

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील (Andheri East Bypoll 2022) शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अखेर स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतले. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला मशाल हे चिन्ह आपल्यासाठी नवीन आहे. छगन भुजबळ 1985 साली या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मशाल हे चिन्ह आपल्यासाठी  शुभ आहे, असे देखील लटके म्हणल्या. 

महापालिकेनं राजीनामा स्वीकारल्याच्या पत्रात काय म्हटलंय?

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने, मा. उच्च न्यायालयातील मा. न्यायमूर्ती नितीन जामदार तसेच मा. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दि. 13.10.2022 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार, आपल्या उपरोक्त विषयासंदर्भातील 3.10.2022 रोजीच्या अर्जाबाबत कळविण्यात येते की, आपला बृहन्मुंबई महापालिकेचा राजीनामा 13.10.2022 (कार्यालयीन वेळेनंतर) पासून स्वीकृत करण्यात येत आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आज भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एबीपी माझाशी बोलताना मुरजी पटेल यांनी 30 हजारपेक्षा जास्त मतांनी जिंकून येईन असा विश्वास व्यक्त केलाय.

अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हा तिढा आता सुटला असून मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना रंगणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
Embed widget