मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान
Mumbai Loksabha consistency Election Date : भारताचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (दि.16) आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शेड्युल जाहीर केले आहे.
Mumbai Loksabha consistency Election Date : भारताचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आज (दि.16) आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शेड्युल जाहीर केले आहे. भारतात 7 टप्प्यांत लोकसभा निवडणूक (Loksabha Election) पार पडणार आहे. महाराष्ट्रात ही निवडणूक एकूण 5 टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 मतदान पार पडणार आहे. शिवाय, कल्याण, दिंडोरी, नाशिक, पालघर, ठाणे,धुळे आणि भिवंडी या मतदारसंघातही 20 मे रोजीच मतदान पार पडेल.
मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबई लोकसभा अशा मुंबईतली 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. याशिवाय कल्याण, दिंडोरी, नाशिक, पालघर, ठाणे,धुळे आणि भिवंडी या मतदारसंघातही 20 मे रोजीच मतदान पार पडणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख कधी ?
निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार वरिल 13 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान पार पडेल. शिवाय, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख 3 मे 2024 आहे. तर 6 मे 2024 पर्यंत वरिल 13 मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख 6 मे 2024 ही असणार आहे.
निवडणूक आयुक्तांनी कोणत्या सूचना दिल्या?
निवडणूक आयुक्तांनी यावेळी बोलताना राजकीय पक्षांना काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. "तुम्ही टीका करू शकता, पण यावेळी कोणत्याही प्रकारे अफवा, फेक न्युज पसरवणे खपवून घेतले जाणार नाही. खोटी माहिती सोशल मीडियावर टाकली असेल तर संबंधित यंत्रणा ती काढून घेण्यासाठी पाऊले उचलू शकतात",असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
निवडणुकीत हिंसा टाळण्याचा आमचा निर्धार : राजीव कुमार
निवडणुकांमध्ये हिंसा टाळण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात केल्या जातील. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूम असतील. तिथे एकूण पाच feed येतील. पोलिंग स्टेशन, चेक पोस्ट आंतरराष्ट्रीय सीमा, आंतरराज्य सीमेवर आहेत. ड्रोन मार्फतही निरीक्षण केले जाईल, असेही आयुक्त यावेळी बोलताना म्हणाले.
General Election to Lok Sabha 2024 - All Phase Map pic.twitter.com/ils9MiK5U3
— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024
इतर महत्वाच्या बातम्या