एक्स्प्लोर

MNS Candidate List : मनसेची सहावी यादी जाहीर, अशोक चव्हाणांच्या लेकीविरुद्ध उमेदवार दिला, किती जणांना उमेदवारी?

MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी सहावी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 32 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी एकला चलोची भूमिका घेतली आहे. मनसेनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 32 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात देखील मनसेनं उमेदवार दिला आहे. साईप्रसाद जटालवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेनं सहाव्या यादीपर्यंत 117 उमेदवार जाहीर केले आहेत. 

मनसेची उमेदवार सहावी उमेदवार यादी : 

1. नंदुरबार - वासुदेव गांगुर्डे
2. मुक्ताईनगर- अनिल गंगतिरे
3.सावनेर- घनश्याम निखोडे 
4.नागपूर पूर्व- अजय मारोडे
5.कामठी- गणेश मुदलियार
6.अर्जुनी मोरगाव-भावेश कुंभारे 
7.अहेरी- संदीप कोरेत
8.राळेगाव- अशोक मेश्राम
9.भोकर- साईप्रसाद जटालवार
10.नांदेड उत्तर- सदाशिव आरसुळे
11.परभणी- श्रीनिवास लाहोटी
12.कल्याण पश्चिम- उल्हास भोईर
13.उल्हासनगर- भगवान भालेराव
14.आंबेगाव- सुनील इंदोरे 
15.संगमनेर-योगेश सूर्यवंशी 
16.राहुरी- ज्ञानेश्वर गाडे (माऊली)
17.नगर शहर- सचिन डफळ
18.माजलगाव-  श्रीराम बादाडे
19.दापोली- संतोष अबगुल
20.इचलकरंजी- रवी गोंदकर
21.भंडारा-अश्विनी लांडगे
22.अरमोरी- रामकृष्ण मडावी
23.कन्नड- लखन चव्हाण
24.अकोला पश्चिम- प्रशंसा अंबेरे
25.सिंदखेडा- रामकृष्ण पाटील
26.अकोट- कॅप्टन सुनील डोबाळे 
27.विलेपार्ले- जुईली शेंडे 
28.नाशिक पूर्व -प्रसाद सानप
29.देवळाली- मोहिनी जाधाव
30.नाशिक मध्य -अंकुश पवार 
31. जळगाव ग्रामीण- मुकुंदा रोटे 
32.आर्वी- विजय वाघमारे

मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या विधानसभा निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेताल आहे. राज ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका घेतली आहे. विशेष बाब म्हणजे मनसेनं माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. 

अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यावरुन महायुतीत खलबतं 

अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरुन महायुतीत चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर  आशिष शेलार यांनी देखील अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडली होती. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत या भेटीत चर्चा  होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मनसेनं आतापर्यंत 117 उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली आहे. आता मनसेच्या येत्या दोन दिवसात किती याद्या येणार आणि मनसे किती जागा लढवणार याकडे सर्वाचंं लक्ष लंगलं आहे. 

इतर बातम्या : 

Deepak Kesarkar : अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचं काम, राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या भेटीपूर्वीच दीपक केसरकरांनी बातमी फोडली?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget