मराठा नेताच मुख्यमंत्री असावा, मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदेच सोडवू शकतात : शितल म्हात्रे
Sheetal Mhatre : पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री बनवावे, अशी मराठा समाजाची मागणी असल्याचे मत शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी व्यक्त केलं.
Sheetal Mhatre : महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार आहे. मात्र, सध्या चर्चा सुरु झाली आहे ती मुख्यमंत्रीपदाची. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज्यभरातील मराठा समाजाची मागणी आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री बनवावे. कारण, मराठा आरक्षणाचा प्रश्नं फक्त एकनाथ शिंदेच सोडवू शकतात असे मत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी व्यक्त केलं. तसेच अण्णासाहेब पाटील आणि सारथी महामंडळामार्फत सर्वाधिक मदत करण्यात आली आहे. राज्याला मराठा नेता हाच मुख्यमंत्री असावा अशी मागणी आता जोर धरू लागल्याचे म्हात्रे म्हणाल्या.
महायुतीला राज्या मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असी मागणी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी असी देखील इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महायुती सरकारचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होण्याची शक्यता
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra CM Oath-Taking Ceremony) 26 तारखेला होणार अशी चर्चा होती, मात्र आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजतयं. नुकताच मिळालेल्या माहितीनूसार महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे 25 आमदार, तर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 7 आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 ते 7 शपथ घेतली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची नावाची जोरदार चर्चा
महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी निवडणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु आता नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नव्हे, तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, याचा निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, ही निवडण्याची मोठी जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: