मी स्वत: निवडणूक लढवणार नाही, पक्ष काढण्यावर अद्याप निर्णय नाही - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली.
Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्ट केली. ते एबपी माझासोबत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी 127 मराठाबहुल विधानसभा मतदारसंघात चाचपणी पूर्ण झाल्याची माहिती दिली. त्याशिवाय आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे करायचे हे अजून ठरलेलं नाही. वेळ आली तर मराठा, मुस्लिम आणि दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढवणार असे मनोज जरांगेंनी सांगितले.
मराठवाड्यातील पाण्याचा मुद्दाही जरागेंनी उपस्थित केला. भविष्यात मराठवाड्यातील पाण्याचा मुद्दा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी आणि 24 तास वीज उपलब्ध करुन दिल्यास कर्जमाफीची गरज नसल्याचं मत त्यांनी यावेळी मांडलं.
सरकारचं आम्हाला राजकारणत ढकलतेय -
मराठा आरक्षणासाठी मी सरकारला वेळ दिला नाही. 13 जुलैपर्यंत सरकारने वेळ घेतला आहे. त्याआधी त्यांना सयोसोयऱ्याच्या मागणीसह आमच्या 9 मागण्या आहेत, त्यांना त्या द्याव्या लागतील. मला आणि आमच्या समाजाला राजकारणात जायचं नाही. पण आमला आरक्षण दिलं नाही तर काय करणार.. हे सरकारचं आम्हाला राजकारणत ढकलत आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली. आता 43 मतदारसंघाची चाचपणी घेत आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही राजकारण उतरणार आहे. आम्ही फक्त शोध घेत आहोत. समजाला न्याय मिळायला हवा. जर आरक्षण दिलं नाही, तर आम्हाला मैदानात उतरावे लागेल.
आरक्षण दिलं तर आम्ही राजकारण उतरणार नाही. आम्ही मराठा समजाची हक्काची लोकं, सर्वसामान्य लोकं दिल्यावर काय? आपला मराठा समाज किती? बाकीच्या समजातील लोकांनाही सोबत घ्यायचेय, त्यांनाही न्याय मिळायला हवा, असे मनोज जरांगे म्हणाले.
127 च्या आसपास जागांवर रिंगणात उतरणार -
दलीत, मुस्लीम, बाराबलुतेदारांचा विषय, लिंगायत, बंजारा समाज.. या सर्वांची चाचपणी केली जात आहे. सर्वांना काय देता येईल, याचा विचार करत आहोत. आम्ही सर्व्हे केला नाही पण चाचपणी सुरु आहे. आरक्षण दिले नाही तर जवळपास 127 च्या आसपास जागांवर निवडणुकीत उतरण्याचा विचार आहे, असे जरांगे म्हणाले.
वेळ पडल्यास मराठा, बंजारा, मुस्लिम, दलित यांची मोट बांधणार असल्याचे जरांगे म्हणाले.
मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न -
मराठवाड्यातील पाण्याच्या प्रश्नाबाबत हात घालणार आहे. पाणी उपलब्ध करुन दिली, 24 तास विज, मालाला योग्य भाव दिल्यास आम्हाला कर्जमाफीचीही गरज नाही, असे जरांगे म्हणाले.
आणखी वाचा :
मोठी बातमी : मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा निवडणूक लढवणार, 127 जागांचा सर्व्हे पूर्ण!