एक्स्प्लोर

शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

Eknath Shinde On Raj Thackeray: एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले, पाहा...

Eknath Shinde On Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं तुमची प्रॉपर्टी नाहीय. ते बाळासाहेब ठाकरेंचं आहे, असं राज ठाकरेंनी ठणकावलं होतं. यावर आता एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरमधील भाषणातून प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

शिवसेना कोणाची आहे हे लोकांनी ठरवलंय. धनुष्यबाण कोणाचं आहे, हे देखील ठरवलं आहे. बाळासाहेबांचं धनुष्यबाण, बाळासाहेबांची शिवसेना गहाण ठेवलेली, जी आम्ही वाचवली नसती तर काँग्रेसने विकून टाकली असती. धनुष्यबाण हे बाळासाहेबांचच आहे, त्यांनीच कमावलं आहे. परंतु आम्ही ते जिवापाड जपलं आहे. त्यासाठी आम्ही सत्ता सोडली, 8-10 मंत्र्यांनी सत्ता सोडली, 50 आमदारांनी सत्ता सोडली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोल्हापूरमधील प्रचारसभेत एकनाथ शिंदे बोलत होते. 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

चाळीस आमदार घेऊन जो म्होरक्या गेला त्यांना अजित पवारांचा त्रास होतो असं म्हणत होते . मग वर्षभरात ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची लाज वाटत होती तो अजित पवार मांडीत येऊन बसला. आता घुसमट होत नाही. या सगळ्यासाठी तुम्ही मतदान करायचं ? यांनी वाट्टेल ती थेरं करायची आणि तुम्ही बघत बसायचं ? तुम्ही मतदार नाही तर गुलाम आहात या असल्या लोकांचे... विचारांची प्रतारणा करणाऱ्यांना परत परत निवडून द्यायचं यासाठी जन्म झाला तुमचा ? निवडणुका आल्या की पैसे फेकले की परत येऊन मतदान करतील हा समज तुम्ही मोडणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राची परिस्थिती बदलणार नाही. महाराष्ट्रात फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण शरद पवारांनी सुरु केलं. महाराष्ट्रात त्यांनी अनेकदा पक्ष फोडले. पण गेल्या ५ वर्षात कळस गाठला. गेल्या ५ वर्षात आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण घेऊन गेले. शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.

बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली- राज ठाकरे

2019 ला तुम्ही ज्यांना मत दिलं ते नक्की कुठे आहे याचा विचार केलात का ? दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ज्यांच्यातून विस्तव जात नसे ते पक्ष एकत्र आले आणि सत्तेत बसले. लोकांनी मतदान शिवसेना-भाजपला, काँग्रेस-राष्ट्रवादीला केल आणि इकडचा गट तिकडे गेला, तिकडचा गट इकडे आला. वाट्टेल तशा युत्या, आघाड्या झाल्या. आणि यांत काय घडलं तर बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली. वैचारिक व्यभिचार किती करायचा? अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, पुढे वर्षभरात अजित पवारच शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले. यातून तुमच्या मताची लायकी काय आहे ते कळलं का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

संबंधित बातमी:

Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget