एक्स्प्लोर

काँग्रेसला धक्क्यावर धक्के, माणिकराव गावितही पक्ष सोडण्याच्या तयारीत

पुत्र भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्याने माणिकराव गावित नाराज आहेत, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे

नंदुरबार : नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. मुलाला लोकसभेचं तिकीट न दिल्यामुळे गावितांनी आपली नाराजी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली. माणिकराव गावित यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं. पुत्र भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्याने माणिकराव नाराज आहेत. भरत गावित चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले, त्यांनी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं, त्यामुळे तरुणांनाही त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, मात्र इतकी वर्ष काम करुन आपल्या मुलाला तिकीट न दिल्याने नाराज झाल्याचं गावित म्हणाले. 30 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात अपक्ष उभं राहायचं की भाजपला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेणार असल्याचं माणिकराव गावित यांनी सांगितलं. 'एबीपी माझा'शी बोलताना माणिकरावांनी आपली खंत बोलून दाखवली. VIDEO | नंदुरबारच्या माणिकराव गावितांचा काँग्रेसला रामराम? नंदुरबारमध्ये भाजपने विद्यमान खासदार हीना गावित यांना पुन्हा संधी दिली आहे, तर काँग्रेसने त्यांच्याविरोधात के. सी. पाडवी यांना रिंगणात उतरवलं आहे. मुलाला तिकीट देण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे माणिकराव बंडाच्या तयारीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील बडं प्रस्थ असलेल्या माणिकराव गावितांच्या बंडाळीचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व असलेली मोठमोठी घराणी आघाडीची साथ सोडत सत्ताधारी भाजपच्या गोटात सामील होत आहेत. त्यातच आता माणिकरावांनीही पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे, वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. तर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटीलही राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget