एक्स्प्लोर

माहीमच्या मोहिमेत अमित ठाकरेंपुढे उद्धव ठाकरेंच्या महेश सावंतांचे आव्हान, तिहेरी लढतीत कोणाचे पारडं जड?  

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माहीमच्या मोहिमेत अमित ठाकरेंपुढे उद्धव ठाकरेंच्या महेश सावंतांचे आव्हान असणार आहे.

Mahim Vidhan Sabha Election 2024 मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात रंजक लढत आता माहीम विधानसभा मतदारसंघात होणार आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमदेवारी जाहीर केल्यानंतर, उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज पदाधिकाऱ्यांच्या बैठीक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदेंकडून आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत अशी तिहेरी लढाई दादर माहीम मतदारसंघात होणार आहे.

मनसेची दुसरी यादी काल जाहिर झाली. या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम विधानसभेतून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेत. पहिल्यांदाच अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा माहीम विधानसभा मतदारसंघातून ते नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी त्यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत असणार आहे.  त्यामुळे या ऐकुणच राजकीय परिस्थितीत माहीम विधानसभा मतदारसंघातील विजयासाठी राजकीय गणित अमित ठाकरे कशी बांधतात, हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र अमित ठाकरेंचा राजकीय कारकीर्द कशी आहे जाणून घेऊ.

ठाकरेंचे दुसरे युवराजही राजकारणात

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सक्रिय राजकारणाचे केंद्र कायमच राहिले. मात्र निवडणुकीच्या राजकारणापासून ते कायमच लांब राहिले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी यांनीही बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल पाऊल टाकलं, मात्र ठाकरेंची दुसरी पिढीही देखील आता राजकारणात सक्रीय झाली आहे. आदीत्य ठाकरें पाठोपाठ आता अमित ठाकरेही आपलं नशीब आजमवू पहात आहेत. 

अमित ठाकरेंसमोर  शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सदा सरवणकर यांचे आव्हान असेल. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महविकास आघाडीतील जागावाटप अद्याप न झाल्याने, या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाहीय. वरळीतून आदित्य ठाकरे 2019 साली लढले होते, त्यावेळेस मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे यावेळी माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे उमेदवार देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दादर माहिममध्ये दिलेल्या उमेदवारीमुळे पंधरावर्षापूर्वी मनसेचा असलेला बालेकिल्ला पून्हा काबीज करण्याची उत्तम संधी अमित ठाकरेंमुळे मनसेला मिळतेय, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरणं आहे. याच उदाहरण द्यायचं झालंचं तर महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना शिवाजी पार्क हे मैदान सभेसाठी हवे असताना ते मिळालं नव्हतं. त्यावेळी राज ठाकरेंनी असा काही करिष्मा केला की या मतदार संघातील सहाच्या सहा नगरसेवक मनसेचे निवडून आले. आता पून्हा राज ठाकरे अमित ठाकरेंच्या विजयासाठी असाच काहीचा करिष्मा करतील अशी चर्चा आहे.

तिहेरी लढतीत कोणाचे पारडं जड?  

महायुतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिंदेकडे गेला. मात्र लोकसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहिर केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंचे असलेले संबध पाहता. भाजपने अमित ठाकरेंना अप्रत्यक्ष पाठींबा दिला. त्याच बरोबर ठाकरेंनी या मतदार संघात उमेदवार दिला. तर मतांची विभागणी होऊन अमित ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर मागील विधानसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी आदीत्य ठाकरे समोर उमेदवार दिला नव्हता. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी उमेदवार जर का नाही दिला. तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार्या सदा सरवणकर यांना धडा शिकवण्यासाठी अमित ठाकरेंना मत देऊन अमित ठाकरेंचा विजय सुखकर होऊ शकतो.

माहिम हा मतदार संघ दिसतो तितका सोपा नाही. पंधरावर्षानंतर पुलाखालून बरच पाणी वाहून गेलयं, मतदार संघापाठोपाठ मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. मराठी पाठोपाठ बहुभाषिक मतदारांचीही यात भर पडलेली आहे. या मतदार संघात मुस्लिम बहुलभागही आहे. अशातच राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने मुस्लिम मतांचा विचार ही अमित ठाकरेंना करावाच लागेल.

कोण आहेत अमित ठाकरे?

अमित ठाकरेंचा जन्म 24 मे 1992 चा आहे. अमित ठाकरेचं शिक्षण बाॅम्बे स्काॅटिजमधून झालं असून आर ए पोतदार काॅलेजमधून पदवीधर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 2019 मध्ये अमित ठाकरेंचा विवाह मिताली बोरूडे यांच्याशी झाला. अमित ठाकरे हे उत्कृष्ठ आर्टीस्टही आहेत. पर्यावरणाबाबतही ते जागरूक असून अनेक पर्यावरणाचे कार्यक्रमही हाती घेत असतात. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi News: साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर
Baba Ram Rahim: भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
Nicolas Maduro: थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!

व्हिडीओ

Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi News: साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर
Baba Ram Rahim: भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
Nicolas Maduro: थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
Pune Crime News: उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
Bhiwandi Election 2026: भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?
भिवंडीतील प्रभाग 20 मध्ये तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यासह दगडांचा मारा, नेमकं प्रकरण काय?
Pune News: बँकेत जाण्यासाठी घरातून निघाला पण परतलाच नाही...; पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत
बँकेत जाण्यासाठी घरातून निघाला पण परतलाच नाही...; पुण्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत
Embed widget